wood.jpg 
नाशिक

काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

सकाळवृत्तसेवा

नाशिक : ऐकावे ते नवलच...जेव्हा न्यायाधीशाच्या घरीच होते चोरी तर सामान्यांची बात काय. चोरट्यांची शिफारत तर अशी की थोडा सुद्धा पुरावा न ठेवता कारनामा केला. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

रविवारी (ता. २) मध्यरात्रीची वेळ...गंगापूर रोड परिसरातील मुख्य न्यायाधीशांच्या बंगल्याचा आवारात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी सुमारे ८ फुट उंचीचे व १० इंच व्यासाचे चंदनाचे झाडाचे खोड बुंध्यापासून तोडून लंपास केले. शहरातील पोलीस अधीक्षकांचा बंगला व पोलीस अकादमीच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाची झाडे लंपास केली आहेत. पोलिसांसह शासकीय अधिकार्‍यांच्याच घरी चोरी केली जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.

जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. चोरांमुळे नागरिक हैराण झाले असून योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यात चंदन चोरीचे प्रमाण वाढत असून, चोरट्यांनी शासकीय अधिकार्‍यांची निवास्थाने व कार्यालयाच्या आवारातील चंदनाच्या झाडांना लक्ष केले आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शिवाजी आहेर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

Nashik Flood: नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती कायम; बाजारात पाणी, त्र्यंबकेश्वरात वीजपुरवठा ठप्प

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

BSF Jawan: सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात जवानाचा मृत्यू

पंढरीच्या वारीचा भक्तिरस अनुभवायचा? 'देवा विठ्ठला' भक्तिगीतातून विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तीचा सुरेल संगम

SCROLL FOR NEXT