satana.jpg 
नाशिक

जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे; नागरिकांत प्रचंड संताप

रोशन खैरनार

नाशिक : (सटाणा) पालिका प्रशासनाने ऐन पावसाळ्यात पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम हाती घेऊन सर्व रस्ते खोदून ठेवल्याने नववसाहतींमधील शहरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. पावसाची रिपरिप आणि जलवाहिनीच्या कामांमुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

रस्ते खोदून ठेवल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनंद पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर थेट पुनंद (ता. कळवण) येथून शहरापर्यंत जलवाहिनी टाकली. मात्र त्यानंतर ऐन पावसाळ्यात पालिका प्रशासनाने अभिमन्यूनगर, क्रांतीनगर, परशुराम कॉलनी, पाठक मैदान, सन्मित्र हाउसिंग सोसायटी या नववसाहतींमधील चांगल्या अवस्थेतील रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. सर्वच रस्ते खोदून ठेवल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांसह बाहेरून येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात रस्ते खोदण्याचे काम करण्याचे कारणच काय, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

स्थानिक नागरिकांकडून निवेदन

नगर परिषदेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या नववसाहतींमध्ये सोयी-सुविधा पुरविण्यास पालिका प्रशासनाने नेहमीच टाळाटाळ केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या रस्त्यांवर तातडीने मुरूम टाकून दुरुस्ती करावी आणि रस्ता रहदारीयोग्य करावा, अशी मागणी विजय वाघ, भालचंद्र कोठावदे, शरद नंदाळे, काशीनाथ सूर्यवंशी, प्रशांत कोठावदे, रतिलाल बागूल, आर. जे. शिवदे, एम. डी. लांडगे आदींसह स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. 

ठेकेदार-प्रशासनाची टोलवाटोलवी 

स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे चिखलमुक्त रस्त्यासाठी मुरूम टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित ठेकेदाराला मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता, रस्ता दुरुस्तीबाबत प्रशासनाशी असे कोणतेही बोलणे झाले नाही, असे सांगून रस्त्यावर मुरूम टाकण्यास नकार दिला. पालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या टोलवाटोलवीमुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी पुनंद पाणीयोजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम आणि भुयारी गटार योजना ही महत्त्वाकांक्षी कामे प्राधान्यक्रमाने होणार आहेत. त्यानंतर सर्वच रस्त्यांची कामे होतील. तोपर्यंत रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. - सुनील मोरे, नगराध्यक्ष 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT