Rajesh-Tope.jpg 
नाशिक

.....यामुळे बिनधास्तपणे मांसाहार करावा - आरोग्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई विमानतळावर विशेष वैद्यकीय पथकाकडून चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचे स्कॅनिंग केले जात आहे. त्यात आतापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही, तसेच कोरोनासंदर्भात मांसाहाराविषयी सुरू असलेला अपप्रचार चुकीचा असून, बिनधास्तपणे मांसाहार करावा, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे व्यक्त केले. 


राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
संदर्भसेवा रुग्णालयास भेट दिल्यानंतर आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. ते म्हणाले, की चीनमध्ये वुहान या प्रांतामध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तरीही चीनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची मुंबई विमानतळावर बारकाईने आरोग्य तपासणी केली जात आहे. काही दिवस त्यांना विशेष शिबिरात ठेवून वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. विशेष शिबिरातून तो प्रवासी सोडल्यानंतरही आरोग्य विभागाकडून त्याचे ट्रॅकिंग केले जात आहे, जेणेकरून शिबिरातून गेल्यानंतर काही त्रास झाल्यास त्यास तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध असावी, हा त्यामागील हेतू आहे. मात्र अद्यापपर्यंत तसे काहीही घडलेले नसल्याचे टोपे यांनी सांगितले. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा बिनधास्त मांसाहार करण्याचा सल्ला 

तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून मांसाहारातून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे संदेश अफवा आहेत. मांसाहारातून कोरोनाचा प्रसार होत नाही. मांसाहार करणाऱ्यांनी अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांनी बिनधास्तपणे मांसाहार करण्याचेही आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी या वेळी केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT