morning-walk.jpg 
नाशिक

जॉगिंग ट्रकला अवकळा...रस्त्यावर वॉक...मनमाडकरांचा होतोय संताप!

सकाळवृत्तसेवा

नाशिक/मनमाड : शहरात जॉगिंग ट्रॅक नसल्याने मनमाडकरांना सध्या "समस्यांच्या ट्रॅक'वरून चालावे लागत आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी वृद्धांना जीव मुठीत घेऊन रस्त्यालाच जॉगिंग ट्रॅक समजून वॉक करावे लागत आहे. 

मैदानांना कचरा कुंडीचे स्वरूप

लॉकडाउनमुळे जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर बंद आहेत. शहरात जॉगिंग ट्रॅक नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण व महर्षी वाल्मिकी स्टेडियम ही दोन मैदाने आहेत. मैदानांना कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. अतिक्रमणाने मैदाने गिळली आहेत. कोरोनामुळे आठवडेबाजार बंद करून मैदानावर भाजी बाजार भरवीत असल्याने कचरा साचतो. त्यामुळे दुर्गंधी सुटते. वाघदर्डी रस्ता, रापली, नगरचौकी, लासलगाव, शिंगवे, डोणगाव, मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव रस्ता यांसह इतर मैदान, मोकळ्या जागांवर वृद्धांसह तरुणाई सकाळी- सायंकाळी फिरताना दिसते. यातील अनेक रस्ते, मैदाने खडबडीत आहेत. चालताना पाय घसरणे, मुरगळणे, चमक भरणे आदी प्रसंग घटतात.

विकासासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे

गाड्यांची वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्‍यता असते. रस्त्यासह सर्वच मैदानांवर पथदीप नाहीत. मोकाट कुत्रे, जनावरे, टवाळखोरांचा तेथे राबता असतो. पोलिसांची गस्त नसल्याने अंधाराचा फायदा घेत मद्यपी मद्य रिचवतात. अनेक ठिकाणी बसण्यासाठी बाक नाही. ट्रॅकच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आरोग्याबाबत सजग असलेल्या मनमाडकरांना सध्या समस्यांच्या ट्रॅकवरून चालावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

जॉगिंग ट्रॅक नसल्याने वृद्धांसह तरुणांना खडबडीत रस्त्यावर रनिंग, वॉक करावे लागत आहे. मैदान व अन्य ठिकाणी जॉगिंग ट्रॅक केल्यास सर्वांनाच फिटनेसमध्ये राहता येईल. - प्रवीण व्यवहारे, क्रीडाशिक्षक 

जॉगिंग ट्रॅक नसल्याने आम्हाला रस्त्याने वॉक करावे लागते. गाड्यांची वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्‍यता असते. थकल्यावर बसण्यासाठी बाक नाही. पालिका प्रशासनाने जॉगिंग ट्रॅक तयार करून बाक बसवावेत. - कृष्णा जी पगारे, ज्येष्ठ नागरिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT