migrants 1.png
migrants 1.png 
नाशिक

चोरीछुपी शहरात 'त्या' कुटुंबीयांची एंट्री...रस्त्याच्या कडेलाच काढली रात्र...पण नंतर जे घडलं ते थक्क करणारंच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : तीन महिला, दोन पुरुष असे एक कुटुंबीय मुंबई येथून ओडिसा येथील मूळगावी जाण्यास निघतात. कसेबसे शहरात दाखल होतात. त्यांची बॅगसह रोख रक्कम चोरी होते. चित्रपटास शोभणारा असा प्रसंग असला तरी तो खरा आहे. कोरोनाच्या भीतीने ते कुटुंबीय चोरीछुपी शहरात दाखल झाले. अंधाराच्या संधीत चोरानी त्यांचे काम केले अन्... 

रोख रक्कम अन् कागदपत्रे गहाळ

मुंबई येथील मजूर कुटुंबीय कोरोनाच्या भीतीने त्यांच्या मूळगावी ओडिसा येथे परतण्यासाठी भाजीपाल्याच्या जीपमध्ये गुरुवारी (ता. 21) रात्रीच्या सुमारास शहरातील द्वारका परिसरात पोचले. रात्री ते तेथेच थांबले. पहाटेच्या सुमारास त्यांचा डोळा लागला. चोरांनी संधी साधत त्यांची बॅग लंपास करीत त्यांची 21 हजारांची रोख रक्कम आणि कागदपत्रे गहाळ केली. मात्र, जाग आल्यावर बॅग चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता घरी परतायचे कसे, अशा विचारात असताना त्यांच्या मदतीसाठी भद्रकाली पोलिस धावून आले. कुटुंबीयाची चौकशी करत त्यांची व्यथा जाणून घेतली. कोरोनामुळे आदीच जीवन असहाय्य झाले होते. जमवून ठेवलेल्या पैशांतून तरी घरी परतू, अशी अपेक्षा असताना त्यांची बॅग आणि रोख रक्कम चोरीस गेल्याने ते अतिशय खचून गेले होते. 

संपूर्ण कुटुंबीयाचे डोळे पाणावले

"हम से क्‍या भूल हुई, जो भगवान हमे इतनी परेशानी दे राहा है', असे म्हणत संपूर्ण कुटुंबीयाचे डोळे पाणावले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे, महिला पोलिस कर्मचारी मनीषा सोनवणे, राजेंद्र मोजाड यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे मन हेलावून गेले. त्यानी केवळ त्यांची तक्रारच दाखल करून घेतली नाही तर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर त्याना आर्थिक मदत केली. स्वतः पोलिसांच्या वाहनातून विल्होळी येथे त्यांना घेऊन केले. तेथून गोंदियाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. घरी जाण्याची व्यवस्था केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT