Sakal - 2021-03-05T131229.785.jpg
Sakal - 2021-03-05T131229.785.jpg 
नाशिक

राज ठाकरेंचा नाशिक दौरा : मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरणारा 'चोर' पोलीसांच्या ताब्यात; पाहा VIDEO

केशव मते

नाशिक :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज (ता.५) तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये आगमन झाले आहे. यावेळी विना मास्कचं राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेल एक्स्प्रेस इनच्या परिसरात एकच गर्दी केली होती. या दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरताना एका चोराला पोलीसांनी पकडले. 

राज ठाकरेंचा नाशिक दौरा :  पाकीटचोर ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. या दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरणाऱ्या चोराला कार्यकर्त्यांनी चोप दिला तसेच संशयित पाकीट माराला पोलिसांच्या ताब्यात दिले.नाशिकच्या हॉटेल एक्स्प्रेस इन च्या लॉबीत कार्यकर्त्यांचं पॉकीट मारतांना प्रकार उघडकीस आला.

फक्त निवडक पदाधिकाऱ्यांशीच चर्चा

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरु केली आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राज ठाकरे फक्त निवडक पदाधिकाऱ्यांशीच चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे.

चोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाल्यावर त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. या दरम्यान हॉटेल येथे राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरणाऱ्या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माजी महापौर मास्क काढण्याचा इशारा

यावेळी विना मास्कचं राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. तसेच राज ठाकरे यांनी "मास्क काढ" असा इशारा यांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांना यावेळी केला.  हॉटेल एक्स्प्रेस इन येथे राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट सोडणाऱ्या चोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT