nashik crime news
nashik crime news esakal
नाशिक

Crime Update : पांगरीत चोरट्यांकडून ATM फोडण्याचा प्रयत्न

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे शिर्डी महामार्गालगत असलेले इंडियन ओव्हरसिस बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न आज दि 13 पहाटे 4 वाजेच्या झाला. चोरट्यांकडून यासाठी सुरुंगाचा ताईत वापरून एटीएम असलेल्या खोलीत स्फोट घडवण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (thieves attempt to break ATM at Pangri Nashik Crime Update Latest Marathi News)

पांगरी गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळच इंडियन ओव्हरसिस बँकेची शाखा आहे. तेथेच शेजारी एटीएम आहे. या आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्या असल्याने प्रत्येक एटीएम मध्ये पुरेशी कॅश ठेवण्याची निर्देश रिझर्व बॅंकेकडून देण्यात आल्यामुळे पांगरी येथील या एटीएम मध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोकड मिळेल या अपेक्षेने चोरट्यांनी चोरीचा घाट घातला असावा.

एटीएम उघडण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यावर चोरट्यानी थेट सुरुंगाचा स्फोट करण्यासाठी वापरले जाणारे ताईत वापरले . मात्र, मजबूत असणारे एटीएमचे या स्फोटाने देखील फुटले नाही. खोलीचे शटर बंद करून चोरट्यांनी हा स्फोट घडवल्याने आजूबाजूच्या लोकांना आवाज जाणवला नाही. सकाळी एटीएमकडे गेलेल्या लोकांना शटर मोडतोड झालेल्या अवस्थेत बंद असल्याचे आढळून आल्यावर हा प्रकार लक्षात आला.

स्फोटामुळे एटीएम रूमच्या दर्शनी दरवाज्याच्या काचा फुटल्या होत्या. तसेच खोलीतील सिलिंग देखील खाली आले होते. एटीएमच्या दर्शनी भागाच्या देखील स्फोटामुळे चिंधड्या उडाल्या होत्या. तसेच या ठिकाणी ताईत जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायरचे तुकडे देखील आढळून आले.

याबाबत वावी पोलीस ठाण्यात कळविण्यात आल्यावर सहाय्यक निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विजय सोनवणे, हवालदार सतीश बैरागी यांचे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली. बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्यात आला.

मात्र, सलग सुट्ट्या असल्याने व्यवस्थापक पुणे येथे घरी गेल्याचे सांगण्यात आले. ते येईपर्यंत एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांना करता आली नाही. हे फुटेज पाहिल्यानंतरच चोरीच्या प्रकारावर भाष्य करता येईल असे पोलिसांनी सांगितले

एटीएम रूम मध्ये स्फोटके वापरल्याचा कोणताही प्राथमिक पुरावा नाही. स्फोटक वापरले असते तर भिंतीवर मशीनवर किंवा खाली जमिनीवर आघात होऊन खड्डा तयार झाला असता किंवा भिंती काळ्या पडल्या असत्या.

मात्र, असा कोणताही प्रकार न आढळल्याने स्फोटक वापरून एटीएम फोडण्यासाठी स्फोट घडवला गेला असे खात्रीशीर म्हणता येणार नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच या संदर्भात अधिक स्पष्टपणे बोलता येईल असे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT