Thief esakal
नाशिक

Nashik Crime News : चोरट्यांनीही साधली दिवाळी ‘संधी’; पोलिसांची नाकाबंदी ‘फेल’

- नरेश हाळणोर

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत चोरट्यांनी यंदाची दिवाळी गोड साजरी केली. गेल्या दहा दिवसांत चोरट्यांनी तब्बल ३७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेत जणू दिवाळीची संधीच साधली. शहर पोलिसांच्या फोल ठरलेल्या नाकाबंदीमुळे चोरट्यांनी तब्बल सहा लाख १५ हजार रुपयांच्या १८ दुचाकी लंपास केल्या. गेल्या २१ ते ३० तारखेदरम्यानच्या दहा दिवसांत पोलिस आयुक्तालय हद्दीत चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्या अन्‌ दुचाकी चोरीचे ३९ गुन्हे दाखल झाले. यामुळे दिवाळीत पोलिसांची कडेकोट नाकाबंदी फोल ठरली. गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान आता शहर पोलिसांसमोर ठाकले आहे. (Thieves burgled for 37 lakhs during diwali festival nashik crime news)

दिवाळीनिमित्त शाळा-महाविद्यालयांना गेल्या २० तारखेला सुट्ट्या लागल्या. अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारांनाही गेल्या २३ ते २९ तारखेपर्यंत सुट्ट्या होत्या. शासकीय व खासगी आस्थापनांमध्येही २३ ते २६ तारखेदरम्यान सुट्ट्या होत्या. त्यामुळे बहुतांशी कामगार व शासकीय कर्मचारी आपापल्या मूळ गावी गेल्याने बहुतांशी घरांना कुलूप होते. चोरट्यांसाठी ही संधीच होती. ही बाब हेरून पोलिस ठाणेनिहाय ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. गस्ती पथकांमध्येही वाढ केली होती.

असे असतानाही शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत गेल्या दहा दिवसांमध्ये चोरट्यांनी ३७ लाख १३ हजार ४०० रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला. बंद घरे हेरून चोरट्यांनी ११ घरफोड्या करून तब्बल २२ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला, तर चोरीच्या सहा गुन्ह्यांमध्ये सहा लाख ३९ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिवाळीत सोनसाखळी चोरटेही मागे राहिले नाहीत. त्यांनीही तिघींची सोन्याची पोत अन्‌ एकाचा मोबाईल हिसकावून नेत दोन लाख १३ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेला.

चोरट्यांपाठोपाठ दुचाकी चोरट्यांनीही शहर परिसरातून सहा लाख १५ हजार रुपयांच्या १८ दुचाकी लंपास केल्या. चोरट्यांनी दहा दिवसांमध्ये चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्या अन्‌ दुचाकी चोरीच्या ३९ गुन्ह्यांमध्ये तब्बल ३७ लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोलिसांची नाकाबंदी फोल ठरवली.

‘एक्साईज’चे दारू गुदामही फोडले

पेठ रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गुदाम आहे. तेथे अवैध जप्त केलेला मद्यसाठा ठेवला जातो. चोरट्यांनीही शुक्रवारी (ता. २८) रात्री मद्याचे गुदाम फोडून चार लाख ६८ हजार रुपयांचा मद्यसाठाच चोरून नेला.

मुंबई नाका, म्हसरूळ, उपनगर हद्दीत वाढ

म्हसरूळ, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी तीन-तीन घरफोड्या झाल्या, तर मुंबई नाका हद्दीत तीन चोऱ्या झाल्या. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक सहा दुचाकी चोरीला गेल्या. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सरकारवाडा हद्दीत एक लाख २७ हजार ५०० रुपयांची घरफोडी झाली. शुक्रवारी (ता. २८) म्हसरूळ हद्दीत सहा लाख ५६ हजारांची घरफोडी केली.

गुन्ह्यांचा प्रकार व संख्या ---------- गेलेला ऐवज

घरफोड्या - ११ --------- २२ लाख ४५ हजार ५०० रुपये
चोऱ्या - सहा --------------सहा लाख ३९ हजार ७०० रुपये
दुचाकी चोरी - १८ -------- सहा लाख १५ हजार रुपये
जबरी चोरी - चार ----------- दोन लाख १३ हजार २०० रुपये

पोलिस ठाणेनिहाय गुन्हे

घरफोड्या : म्हसरूळ (तीन), उपनगर (तीन), देवळाली कॅम्प, अंबड, पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर (प्रत्येकी एक-एक)

चोऱ्या : मुंबई नाका (तीन), भद्रकाली, पंचवटी, गंगापूर (प्रत्येकी एक-एक)

दुचाक्या चोरी : मुंबई नाका (सहा), भद्रकाली (दोन), सातपूर (दोन), नाशिक रोड (दोन), म्हसरूळ, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर, गंगापूर, आडगाव (प्रत्येकी एक-एक)

जबरी चोरी : उपनगर, देवळाली कॅम्प, आडगाव, मुंबई नाका (प्रत्येकी एक-एक).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT