Theft esakal
नाशिक

दुकान फोडून लांबविले 10 LED TV; वाढत्या चोऱ्यांचा नागरिकांना धसका

संतोष घोडेराव

अंदरसुल (जि. नाशिक) : नाशिक- औरंगाबाद महामार्गावर असलेल्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथील जीवन सुराडे यांच्या जीवन फर्निचर मॉल या फर्निचरच्या दुकानमधील दहा एलईडी टीव्ही (LED TV) चोरट्यांनी चोरुन नेले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असुन नागरिकांना वाढत्या चोऱ्यांचा धसका बसला आहे.

अंदरसूल येथील जीवन सुराडे यांनी आपल्या फर्निचर दुकानाच्या ठेवलेल्या एकत्रित रॅकला लावलेली लोखंडी साकळी तोडली व तार कंपाऊंडच्या तारा तोडत दुकानाच्या मागील बाजूस रॅकच्या सहाय्याने वर चढले. या चोरट्यांनी दुकानाच्या दुकानाच्या मागचा पत्रा वाकवून दुकानात प्रवेश केला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी फर्निचर दुकानामधील जवळपास दोन लाख रुपये किमतीचे दहा एलसीडी टीव्ही चोरून नेल्याने परिसरात खळबळजनक माजली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यासंदर्भात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.

चोरट्यांनी रॅकचा आधार घेत दुकानात शिरण्यासाठी वाकवलेला पत्रा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: विद्यार्थ्यांच्या नव्हे, राहुल यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटले; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT