Market Committee nashik esakal
नाशिक

Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणुकीत तिसऱ्या दिवशी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल!

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष संजय तुंगार, माजी संचालक शंकर धनवटे यासह सर्वसाधारण गटातून धनाजी पाटील, अनिल ढिकले तर विमुक्त जमाती भटक्या जमाती गटातून प्रल्हाद काकड यांनी अर्ज दाखल केले. (third day of Nashik market committee election 12 candidates filed their applications nashik news)

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया सुरू असून २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी एक तर, दुसऱ्या दिवशी दोन, तिसऱ्या दिवशी १२ असे एकूण १५ अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहे.

बुधवारी माजी संचालक संजय तुंगार, शंकर धनवटे यांनी अर्ज दाखल केले. शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांनी अर्ज दाखल करत रिंगणात उतरले आहे. विमुक्त जमाती भटक्या जमाती गटातून नाशिक तालुका संघाचे माजी अध्यक्ष प्रल्हाद काकड यांनी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज दाखल करण्यास चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. माजी सभापती तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या गटातील इच्छुकांकडून शुक्रवारी (ता.३१) अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. माजी सभापती शिवाजी चुंभळे गटातील उमेदवारांकडूनही अर्ज दाखल करण्याची तयारी झाली असून शक्तीप्रर्दशनाद्वारे अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

विमुक्त जमाती भटक्या जमाती - प्रल्हाद काकड.

इतर मागासवर्ग मतदार संघ - धनाजी पाटील.

सर्वसाधारण - धनाजी पाटील, अनिल ढिकले, शंकराव धनवटे,संजय तुंगार,

प्रभाकर माळोदे,उत्तम खांडबहाले,राजाभाऊ ढगे.

शेतकरी सर्वसाधारण - प्रभाकर माळोदे,

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक - सदानंद नवले,

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती - यमुना जाधव.

तीन दिवसात १६६ अर्जाची विक्री

बाजार समिती निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत असताना दुसरीकडे, अर्ज विक्री मोठी होत आहे. गत तीन दिवसात १८ जागांसाठी तब्बल १६६ अर्जाची विक्री झाली आहे. यात पहिल्या दिवशी ५६, दुसऱ्या दिवशी ४४ तर बुधवारी तिसऱ्या दिवशी ६६ अर्जाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT