third set of Nashik Thermal plant will also ignited Nashik news esakal
नाशिक

नाशिक : औष्णिकचा तिसरा संच भारनियमनात ठरणार आधार

नीलेश छाजेड

नाशिक : राज्यात एकीकडे कोळसा टंचाई मुळे भारनियमनाची परिस्थिती उद्भवली असतांना महानिर्मितीच्या (Mahagenco) इतिहासात गेल्या 10 वर्षांत 27 पैकी 27 संचांमधून वीज निर्मिती झाली नव्हती ती नाशिकचा एक संच सुरू झाला की 27 ही संचांमधून वीजनिर्मिती होणार आहे. गत काही वर्षांपासून महानिर्मितीचे 7 ते 10 संच अनेकदा झिरो शेड्युल तर तांत्रिक कारणांमुळे व पाण्यामुळे बंद राहत होते.

परंतु आज च्या मितीला नाशिक वगळता कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ या सहा ही केंद्रातील एकूण 26 संच सुरू आहेत व आता नाशिक च्या तीन पैकी बंद असलेल्या 1 संचाला सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने येथे कामगार अभियंत्यांची कमतरता असल्याने तिसरा संच सुरू करण्यास अडचणी येत होत्या पण आता डेप्युटेशन वर तंत्रज्ञ व अभियंता यांच्या नाशिकसाठी प्रतिनियुक्तीवर बदल्या निघाल्या आहेत. येत्या काही दिवसात नाशिकच्या तिसऱ्या संचांमधून ही वीजनिर्मिती सुरू होऊन महानिर्मितीचा सर्व संच सुरू राहण्याचा उच्चांक होणार आहे.

आज दुपारी नाशिक 307 मेगावॅट, कोराडी 1727, खापरखेडा 980, पारस 442, परळी 525, चंद्रपूर 2213, भुसावळ 884 मेगावॅट अशी वीज निर्मिती सुरू होती यात 27 पैकी नाशिक चा फक्त 1 संच बंद आहे. उरण वायू केंद्रातून 214 मेगावॅट, जलविद्युत मध्ये घाटघर वगळता सर्व वीज केंद्रातून 870 मेगावॅट, तर सोलर मधून 95 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू असून महानिर्मितीची एकूण 8700 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होती.

प्रतिनियुक्तीवर कामगार -अभियंता यांच्या बदल्यांमुळे नाशिकचा तिसरा संच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे व नाशिकचे महत्व पुन्हा महानिर्मितीमध्ये अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वारंवार शारीरिक संबंध आणि मुलाचा जन्म म्हणजेच विवाहासमान नातं, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, काय सांगितलं?

काकांनी कमरेत हात घातला... मौनी रॉयसोबत हरियाणामध्ये छेडछाड; हटकल्यावर दिल्या शिव्या, स्टेजवर जाताच समोरून

Sahar Sheikh:''माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा, त्यामुळे...'' सहर शेख यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात काय खुलासा केला?

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचं सगळं टेन्शन संपलं! नवीन मेंबर्सही पाहून शकतील जुने चॅट; जाणून घ्या काय आहे जबरदस्त अपडेट

Local Body Election Maharashtra : ब्रेकिंग न्यूज! राज्यात जिल्हा परिषदेत भाजपने खाते उघडले, दोन उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT