esakal
नाशिक

Wedding Season : नोव्हेंबरपासून लग्नाचा धूमधडाका! गतवर्षपिक्षा यंदा 8 मुहूर्त जादा

सकाळ वृत्तसेवा

Wedding Season : दिवाळीनंतर लग्नकार्याचे मुहूर्त असून नोव्हेंबर २०२३ ते १४ जुलै २०२४ पर्यंत एकूण ६६ तिथी आहेत. त्यामुळे यंदा नोव्हेंबरपासून लग्नाचा बार उडणार आहे. दरम्यान पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकाच्या उत्पन्नात घट होणार असल्याने विवाह सोहळ्यातील बडेजाव कमी होणार आहे. (This year 8 muhurat more of marriage than last year nashik news)

लग्न तिथीनुसार वधू-वर, पालक लग्न जमविण्यासाठी पाहुण्यारावळ्याकडे विचारपूस करत आहेत. शिवाय ज्या वधू-वराचे लग्न जमले आहेत. त्याचे पालक पंचाग पाहून सोयीची तारीख व वेळ निश्चित करण्यासाठी पंचागकल्यांकडे विचारणा करीत आहेत. दरम्यान यावर्षी आठ मुहूर्त जास्त आहेत.

यंदा लग्नाच्या हंगामाला नोव्हेंबरपासून सुरवात होत असून १५ जुलै २०२४ पर्यंत आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. त्या दृष्टीने वधू-वर पालक लग्न जमविणे आणि तिथीसाठी धावपळ करत आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पीकपाणी कमी राहणार आहे. पीकपाणी कमी झाल्याने उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.

परिणामी लग्नकार्यावरही परिणाम होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांना मुला-मुलीचे लग्न करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पावसाअभावी शेतात पिकले नसल्यामुळे थाटमाट कमी करावे लागणार आहे.

पंचागांनुसार नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ पर्यत ६६ विवाह मुहूर्त आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वाधिक लग्न तारखा आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये दहा मुहूर्त असून सर्वात कमी मुहूर्त मे व जून २०२४ या महिन्यात आहेत.

सूर्यास्तापूर्वी सहा मिनिटे मुहूर्त...

मागील लग्न हंगामापेक्षा यंदा आठ मुहूर्त जास्त आहेत. एकूण ६६ मुहूर्तापैकी ४४ मुहूर्त गोरज मुहूर्त आहेत. गोरज मुहूर्त म्हणजे गुरूशिवाय इतर वारी सूर्यास्तापूर्वी सहा मिनिटे लग्न विधी करण्याचा मुहूर्त काढला असेल तर स्थानिक सूर्यास्तरानंतरच्या दोन मिनिटांनी लग्नविधी करावा. नोव्हेंबरपासून लग्न कार्य सुरू होणार असून पंधरा जुलैपर्यंत हंगाम असल्याचे पंचागनतज्ज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT