Losses Of Ganesha Sculptors  
नाशिक

तिसऱ्या वर्षीही गणेश मूर्तीकारांचे अर्थकारण शून्यावर

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

पर्यायाने व्यवसायातला नफा २० टक्‍क्‍यांहून खाली आला आहे.

नाशिक रोड (नाशिक): नाशिक शहरातल्या मूर्तीकारांचे अर्थकारण सध्या बिघडले आहे. सलग दोन वर्ष कोरोनामुळे वीस टक्क्यांवर मूर्तीविक्री, सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमावरील मर्यादा यामुळे मूर्ती व्यवसाय शून्यावर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे मोठ्या मूर्ती बनविणे बंद झाले आहे. पर्यायाने व्यवसायातला नफा २० टक्‍क्‍यांहून खाली आला आहे.

सध्या मूर्तिकार धास्तावले आहे. सलग दोन वर्ष कोरोनामुळे घटलेली मूर्तीविक्री आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर असलेली बंदीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या केवळ दोन फुटापर्यंत मूर्ती बनवण्यासाठी परवानगी आहे. या मूर्ती सध्या घरगुती गणेशोत्सवाला विकल्या जाणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर सध्या कायदेशीर आणि तांत्रिक अडचणीमुळे टांगती तलवार आहे. अनेक परवानग्या काढाव्या लागल्या. यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळ सध्या सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी धजावत नाही. पर्यायाने मोठ्या मूर्ती विकल्या जात नाही. गेल्या दोन वर्षापासून मूर्तिकारांची उपासमार सुरू आहे. तिसऱ्या वर्षीही या मूर्तिकारांचे अर्थकारण शून्यावर आले आहे. त्यामुळे या मूर्तिकारांना शासनाने अर्थसाहाय्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

सलग दोन वर्षापासून व्यवसाय ठप्प झाला आहे. नाममात्र खर्चही निघत नाही. याशिवाय तयार केलेल्या मूर्ती सर्वच विकल्या जात नाही. दोन फुटांपर्यंत गणेशमूर्ती तयार करीत आहोत. मोठ्या मूर्तींसाठी मागणी शून्यावर आली आहे. शासनाने मूर्तिकारांना अर्थसाहाय्य करायला हवे.

- सीमा गोपाल भाटी, मूर्तीकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT