Nashik Crime News
Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News | मोगरे खून प्रकरण : महामार्गावर पोलिसांकडून कसून तपासणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी फाटा येथे गुरुवारी (ता. २३) रात्री रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे यांच्या निर्घृण खून प्रकरणात पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत ठोस काही लागलेले नाही. मात्र, पोलिसांकडून मुंबई- आग्रा महामार्गावरील हॉटेल्स, बार, हॉस्पिटल्सची कसून तपासणी करण्यात येत असून, या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसात ताब्यात घेत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतील रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश सुरेश मोगरे (३९, रा. इंदिरानगर) यांच्यावर गुरुवारी रात्री पाथर्डी फाट्यावरील हॉटेल अंगणबाहेर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला.

मोगरे यांच्यावर संशयितांनी चाकूने वीस वार केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी (ता. २४) पहाटे मृत्यू झाला. मोगरे यांच्यावर पानटपरीबाहेर हल्ला केल्यानंतर त्यांची किया कार (एचएच- १५- एचवाय- ४९५९) घेऊन संशयित पसार झाले.

वाडीवऱ्हेनजीक ही कार सोडून तिथूनही संशयित दुसऱ्या कारमधून पसार झाले. हल्ल्याच्या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही नसल्याने महामार्ग परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेत संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, सूडभावनेतून मोगरे यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संशयितांनी मोगरे यांची कार, लॅपटॉप, कागदपत्रे तशीच सोडल्याने त्यांची हत्या सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन केली असावी, असाही अंदाज व्यक्त होत आहे. पोलिस त्या दिशेनेही मोगरे यांच्या खुनाचा तपास करीत आहेत.

एक संशयित जखमी

मोगरे यांच्यावर हल्ल्या करणाऱ्यांपैकी एका संशयिताला दुखापत झालेली आहे. मोगरे यांच्यावरील हल्ल्यानंतर संशयितांनी त्यांची किया कारमधून पलायन केले. त्या वेळी कारच्या दिशेने दगड फेकल्याने त्यात एकजण जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर शहरातील वा महामार्गावरील हॉस्पिटल वा क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आला असावा.

त्यामुळे शहर गुन्हे शाखेकडून महामार्गांवरील हॉटेल्स, बार, हॉस्पिटल्सची कसून तपासणी केली जात आहे. तसेच, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिस ताब्यात घेत आहेत. ज्यातून संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

आतपर्यंत ३५ जणांचे जबाब

पोलिसांनी मोगरे यांच्याशी संबंधितांची कसून चौकशी केली जात आहे. आत्तापर्यंत ३०-३५ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, मोगरे यांच्या नातेवाइकांकडेही चौकशी केली जात आहे.

तसेच, त्यांचा कोणाशी वाद वा अन्य काही प्रकरणांचाही तपास पोलिस करीत आहेत. संशयित मुंबई वा पुण्याच्या दिशेने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी श्‍वान पथकाच्या मदतीने व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT