markaj.jpg 
नाशिक

मरकजहून परतलेले "ते" सात जण अद्याप बाहेरच..अन् एका नावाबद्दल संदिग्धता 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या मरकजच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शहरात परतलेल्या 14 पैकी सात जणांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन केले आहे. महापालिकेच्या मदनीनगर कक्षात नऊ क्वारंटाइन असलेल्यांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. 

एका नावाबद्दल संदिग्धता
राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला 14 जणांची यादी पाठविली होती. यातील सात जणांचा शोध घेण्यात आला. सात नागरिक अद्याप बाहेरच आहेत. एका नावाबद्दल संदिग्धता आहे. रविवारी नव्याने फक्त एकजण दाखल झाला. दोघांवर उपचार सुरू आहेत. सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत 20 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. 18 जणांचा अहवाला निगेटिव्ह आला असून, दोन अहवाल प्रलंबित आहेत. सामान्य रुग्णालयात दोन व मदनीनगर येथे नऊ, अशा एकूण 11 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. किशोर डांगे, डॉ. भीमराव त्रिभुवन यांनी सांगितले. शहरात विदेशातून परतलेल्यांची संख्या 118 झाली आहे. यातील 56 जणांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. 60 नागरिकांची वैद्यकीय देखरेख व नियमित तपासणी सुरू आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात असलेले दोघे जणही निरीक्षणाखाली आहेत. 

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

जीवन हॉस्पिटलचा मार्ग मोकळा 
महापालिका प्रशासनाने कोरोना विषाणू नियंत्रणासाठी शहरातील खासगी जीवन हॉस्पिटल अधिग्रहित केले आहे. या हॉस्पिटलमध्ये 60 खाटांची सोय आहे. मात्र, कोरोनासाठी रुग्णालय देण्याबाबत संबंधित संचालकांच्या मनात संशय होता. आयुक्त श्री. बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीची बैठक झाल्यानंतर हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला. श्री. बोर्डे, श्री. कापडणीस यांच्यासह सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे, डॉ. रितेश महाले, डॉ. भीमराव त्रिभुवन, डॉ. सुमीत शहा, डॉ. विलास चोरडिया, डॉ. पीयूष रणभोर, डॉ. प्रशांत ठोके, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे आदींनी या रुग्णालयाची पाहाणी केली. त्यात गरजेनुसार आवश्‍यक असलेल्या वैद्यकीय वस्तू अधिग्रहित करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

Sports News: नाशिकचा हर्षवर्धन केसरी विजेता; महाराष्ट्र केसरी कुस्ती;सोलापूरचा महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

Nagpur Accident: राज्यात रस्ते अपघातात वर्षभरात १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू; अपघातांच्या घटना वाढल्या, २०२४ मध्ये १५ हजार ७१५ मृत्यू!

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT