lumpy skin disease  sakal
नाशिक

इगतपुरीत लंपी त्वचारोगाचे थैमान; हजारो जनावरे बाधित

गोपाळ शिंदे

घोटी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात सद्य:स्थितीत लंपी त्वचारोगाने थैमान घातले आहे. अशातच ७३ हजार पशुधनाची देखरेख केवळ ११ डॉक्टरांच्या मदतीने होत असून, तालुक्यात १४ पशुधन रुग्णालय सुरू असलेल्या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा व्याप वाढला आहे. पशुपालकांना पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची अक्षरशः वाट पाहत बसावे लागते.


तालुक्यात पशू संवर्धनासाठी १४ रुग्णालय आहे. यातील अनेक रुग्णालय हे मोडकळीस आली आहेत. तीन पशू वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असून, परिचर संवर्गातील नऊ पदे रिक्त आहेत. आधीच मनुष्यबळ कमी आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला तालुका यामुळे अतिरिक्त कामाचा ताण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत असतो. यामुळे तालुका पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांनी फिरता दवाखान्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यातील ११९ पैकी १५ गावांत लंपी स्कीन साथ रोगाचे थैमान वाढले आहे. या आजाराने पाच हजार दोनशेहून अधिक जनावरे बाधित झाली आहेत. यासाठी उपयुक्त औषधांचा वापर करून साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. या रोगाची लक्षणे गाय व बैल या पशुधनाला अधिक प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. जनावरांच्या शरीरावर विविध भागावर गाठी निर्माण होऊन काही दिवसांनी या गाठी फुटून जखमा तयार होतात. मात्र, मृत्यू प्रमाण कमी असले तरी जनावरांना शारीरिक वेदनांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. पंधरा गावांमध्ये तीन हजार जनावरांचे लसीकरण झाले असून, पाच किलोमीटर अंतरावरील गावांतील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. यासाठी अधिकचा लसीचा साठा वरिष्ठ कार्यालयातून मागणी केला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.



तालुक्यात पशुधनाला विविध प्रकारच्या आजाराने ग्रासले आहे. पशुधन अधिकारी रिक्त पदे आणि भौगोलिकदृष्ट्या इगतपुरीचे क्षेत्रफळ मोठे असल्याने अधिकाऱ्यांवर कामाचा ताण आहे. पशुधन वाचवून रिक्त पदे तातडीने भरावे. - नारायण जाधव, अध्यक्ष, शेतकरी संघटना.


इगतपुरी तालुक्यासह राज्यात लंपी त्वचारोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याने पशुपालकांनी घाबरून न जाता १९६२ क्रमांक वर संपर्क साधावा. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेत उपचारासाठी प्रयत्न करावे.
- डॉ. प्रदीप कांगने, पशुसंवर्धन विकास अधिकारी, इगतपुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचं' सुरज चव्हाणने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...'मी त्याचा सारखा एकदाच पण टॉप...'

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची आज 'देवगिरी'वर बैठक

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT