yeola techers.jpg 
नाशिक

VIDEO : "विनाअनुदानित प्राध्यापकांचा वर्षानुवर्षाचा कोरोना संपवा!" प्राध्यापकांचे घरातच आत्मक्लेश आंदोलने

संतोष विंचू

नाशिक / येवला : कुणाला 10 तर कुणाला पंधरा वर्षे झाले पण अद्याप वेतन नाही त्यामुळे शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकांना तत्काळ अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील हजारो प्राध्यापक घरात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन अनुदानित,विना अनुदानित समस्याग्रस्त शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

तत्काळ शासनादेश मंजूर करावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या समस्यांकडे शासन दुर्लक्षच करत असल्याने शिक्षक महासंघाने अखेर मंगळवारी (दि.26) आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा संतोष फाजगे यांनी याबाबत इशारा दिला होता. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे.
राज्यातील मूल्यांकन पात्र घोषित किंवा अघोषित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्यांना 11 मार्च 2020 च्या वित्त विभागाच्या मंजुरीनुसार अनुदान घोषित करावे.त्यासाठी तत्काळ शासनादेश मंजूर करण्याची मागणी शिक्षक महासंघाने केली आहे. 

पाठपुरावा करूनही शासन स्तरावरुन निर्णय नाहीच
गेल्या अनेक दिवसांपासून मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही शासन स्तरावरुन कोणताच निर्णय घेतला जात नसल्याने अखेर शासनाविरोधात आता शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील सर्व कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी उपोषणाद्वारे आत्मक्लेश आंदोलन घरी बसूनच करत आहेत.


■ या आहेत प्राध्यापकांच्या मागण्या
● राज्यातील मूल्यांकन पात्र घोषित किंवा अघोषित कनिष्ठ महाविद्यालयांना 11 मार्च 2020 च्या वित्त विभागाच्या मंजूरीनुसार अनुदान घोषित करावे
●2003-04 पासून 2017-18 पर्यंतच्या वाढीव व व्यपगत पदांना मंजूरी देऊन त्यावर कार्यरत शिक्षकांना वेतन मिळावे
●राज्यातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषय शिक्षकांना अनुदान देऊन वेतन द्यावे
●2 मे 2012 नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता व वेतन द्यावे
●11वीच्या किमान परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना 12वीत प्रवेश देण्यात यावा

■ राज्यभर कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या वतीने घरात बसून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनाबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे येवला तालुकाध्यक्ष प्रा.एम.पी.गायकवाड यांनी मांडलेली भूमिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT