jailed  esakal
नाशिक

Milk Adulteration Crime: दूध भेसळ प्रकरणात 'त्या' तिघांना 3 दिवस पोलीस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Milk Adulteration Crime : दुध संकलन केंद्रांमार्फत जमा होणाऱ्या दुधामध्ये आरोग्य सापयकारक असणाऱ्या कॉस्टिक सोड्यासह मिल्क पावडरची भेसळ करणाऱ्या मिरगाव येथील हिंगे बंधू सह त्यांना दूध भेसळीचे साहित्य पुरवणाऱ्या हेमंत पवार यास सिन्नर न्यायालयाने सोमवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Three days in police custody for milk adulteration case nashik crime news)

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रविवारी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ओम सद्गुरु दूध संकलन केंद्रात छापा टाकत दुधात होणारी कास्टिक सोडा आणि मिल्क पावडरची भेसळ रंगीहात पकडली होती.

यावेळी दूध भेसळ करून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या संतोष विठ्ठल हिंगे, प्रकाश विठ्ठल हिंगे या दोघा भावांसह त्यांना दूध भेसळीचे साहित्य पुरवणाऱ्या उजनी येथील हेमंत श्रीहरी पवार याला विशेष पथकाने ताब्यात घेतले होते.

हिंगे बंधूंच्या घरातून पोलिसांनी भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य ताब्यात घेतले होते. तर पवार याच्या घराशेजारच्या गोदामातून सुमारे अकरा लाख रुपये किमतीची मिल्क पावडर, कास्टिक सोडा असा सुमारे 300 गोण्या मुद्देमाल हस्तगत केला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्त सुवर्णा महाजन यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांच्या विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी या तिघांना पोलिसांनी सिन्नर न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने तिघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर याप्रकरणी तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT