girls drowned pond.jpg 
नाशिक

धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावाजवळील शिवाजीनगर पाझर तलावात बुडून बुधवारी (दि.१८) तीन बालिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

अशी घडली घटना...

साप्ते गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवाजीनगर पाड्यावर राहणाऱ्या सोनू बेंडकोळी यांच्या मुली जिजा सोनू बेंडकोळी (९), धनश्री सोनू बेंडकोळी (७) तसेच स्वप्नीली यशवंत बेंडकोळी (५) या तीघी जवळील एका पाझर तलावाजवळ खेळताना पाण्यात आंघोळीसाठी उतरल्या असता बुडाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत गावातीलच अंगणवाडीत शिकणारी बालिकाही होती. या तीघी पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच त्या बालिकेने गावात येऊन आई-वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेत तीन्ही चिमुकलींचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती हरसूल पोलिसांना सरपंच राजू बेंडकोळी यांनी दिली.

दोन्ही बहीणी गेल्याने कुटुंबावर आभाळ फाटले​...

काही वेळेतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तीन्ही मृतदेहांचा पंचनामा करून हरसूल पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविले. यामध्ये बेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. या दोन्ही बहीणी पेठ तालुक्यातील शासकिय आश्रमशाळेत शिकत होत्या. तसेच स्वप्नाली ही अंगणवाडिकेत अक्षरओळखचे धडे गिरवित होती. घटनेची माहिती मिळताच आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूलाजवळ भीषण अपघात! , दोन ट्रकची धडक अन् भयानक आगडोंब ; सात जणांचा मृत्यू

DMart : डीमार्टमधली चोरी थांबवण्यासाठी कंपनीने केली भन्नाट आयडिया; तुम्ही चुकूनही या ट्रॅपमध्ये अडकू नका..खरेदीला जाण्यापूर्वी हे बघाच

Delhi Bomb Blast: तो मसूद अझहर नाहीतर...; दिल्ली बॉम्बस्फोटांचा खरा सूत्रधार कोण? कट कुणी रचला? हँडलरचे नाव आले समोर

Bageshwar Dham Dhirendra Shastri Health : बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्रींची तब्येत बिघडली; सनातन एकता पदयात्रेत आली चक्कर अन् झाले बेशुद्ध

Latest Marathi Breaking News Live : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची ओरबडणारा आरोपी जेरबंद

SCROLL FOR NEXT