Nashik News
Nashik News  esakal
नाशिक

Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांच्या गळफास घेत आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.

आडगाव शिवारातील हनुमान नगरमध्ये ३६ वर्षीय समाधान भाईदास पाटील (रा. परिक्रमा हौ. सोसायटी) यांनी मंगळवारी (ता. २१) राहत्या घराच्या बेडरुममध्ये फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. (Three people committed suicide by hanging themselves in different incidents Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. उपनगर परिसरातील पंचशील नगरमध्ये राहणार्या लक्ष्मण नारायण म्हातमे (४५) यांनी विजय-ममता टॉकिजच्या बाजुला असलेल्या जागेतील होर्डिंगच्या अँगलला वायरने गळफास घेतला.

याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तिसर्या घटनेत नाशिकरोड रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या नालंदा लॉजींगमध्ये सुनील आसुधाराम मनवानी (३६, रा. आर्यनगर, नागपूर) याने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT