Prakash Jadhav, Bhagchandra Khairnar & Dipak Talele esakal
नाशिक

Nashik News : एकाच कंपनीतील तिघांचा 2 दिवसांत ह्रदयविकाराने मृत्यू

सातपूर येथील एकाच कंपनीतील तीन कामगारांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने दोन दिवसांत मृत्यू झाल्याने कंपनीतील कामगार व अधिकारी वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

द्वारका : सातपूर येथील एकाच कंपनीतील तीन कामगारांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने दोन दिवसांत मृत्यू झाल्याने कंपनीतील कामगार व अधिकारी वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (Three people from same company died of heart disease in 2 days Nashik News)

कंपनीच्या पेंटशॉप विभागातील कामगार प्रकाश बाळासाहेब जाधव (वय ४५, रा. अमृतधाम, पंचवटी) यांचे ह्रदयविकाराने घरीच गुरुवारी (ता.१८) सकाळी निधन झाले.

ते मायको कंपनीतील निवृत्त कामगार बाळासाहेब जाधव यांचे पुत्र व महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील कार्मिक व्यवस्थापन विभागातील कर्मचारी नीलेश जाधव यांचे बंधू होत.

तर शुक्रवारी (ता.१९) दुसऱ्या दिवशी बॉडीशॉप विभागातील कामगार भागचंद चिला खैरनार (वय ५७) यांचे निधन झाले. दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांना अचानक ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. खैरनार यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी पाटणे (ता. मालेगाव) येथे झाला.

तिसरे कामगार दीपक अनिल तळेले (वय ३५, रा. कामठवाडे) यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्याने ते मित्रासोबत तातडीने त्रिमूर्ती चौकातील खासगी दवाखान्यामध्ये लिफ्टने जातानाच त्यांचाही ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने मृत्यू झाला.

त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी व चौथीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. तळेले यांचा अंत्यविधी मोरवाडी येथील अमरधाममध्ये करण्यात आला. प्रसंगी कंपनीतील कामगारांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT