truck driver.jpg
truck driver.jpg 
नाशिक

चालत्या ट्रकला अडवून दुचाकीस्वार त्रिकुटाचा कारनामा! त्रिकुट फरार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चालक जाधव बुधवारी (ता.१५) ट्रकमध्ये प्लॅस्टीक पाईप घेवून शहरात आले होते. पुणे महामार्गावरून नाशिक रोडहून सिन्नरच्या ट्रक जात असतांना दुचाकीवर आलेल्या संशयीत त्रिकुटाने ट्रक अडवले अन् मग....

असा घडला प्रकार

नाशिक पुणे महामार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूलावर सिन्नर फाटा परिसरात चालक नितीन अशोक जाधव बुधवारी (ता.१५) (एमएच ०९ यु ९३७४) आयशर ट्रक मध्ये प्लॅस्टीक पाईप घेवून शहरात आले होते. पुणे महामार्गावरून नाशिक रोडहून सिन्नरच्या ट्रक जात असतांना दुचाकी (एमएच १५ जीजे ९४११) या दुचाकीवर आलेल्या संशयीत त्रिकुटाने ट्रक अडवून चालकास कोयत्याचा धाक दाखवित मारहाण करीत खिशातील ५०० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. तसेच ट्रकच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडून हे संशयीत त्रिकुट फरार झाले.

ट्रक चालकाकडून तक्रार दाखल

नाशिक पुणे महामार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूलावर सिन्नर फाटा परिसरात प्लास्टीक पाईप घेउन चाललेल्या ट्रकला अडवून दुचाकीस्वार त्रिकुटाने चालकास लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनिकेत सुरेश साठे (रा.जयप्रकाशनगर,सामनगाव रोड),सचिन संतोष पटेल (रा.अरिंगळे मळा,ओढारोड) व जयेश रामेश्वर अपार (रा.भोरमळा,ओढारोड) अशी जबरीलुट प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन अशोक जाधव (रा.सिल्वासा,दादरा नगर हवेली) या ट्रक चालकाने तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT