dindi warkari 1.jpg 
नाशिक

वारकऱ्यांसोबत संतापजनक प्रकार करणारे आता पोलीसांच्या ताब्यात..!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक /जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला निघालेल्या जायखेडा (ता. बागलाण) येथील दिंडीतील वारकऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली.  वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खडकी येथे घडला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी वारकरी बांधवांकडून करण्यात आली होती. खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करीत तीन संशयितांना ताब्यात घेऊन कारवाई केली.",

अशी घडली घटना....

दरवर्षीप्रमाणे यंदाही (ता.१०) तुकाराम बीज निमित्त पंढरपुर ते देहू पायी दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये जायखेडा येथील वै. कृष्णाजी माऊलींच्या शिष्यांसह अनेक वारकरी सहभागी झाले होते. मंगळवारी दुपारी एक वाजता ही दिंडी खडकीतील किर्लोस्कर कंपनीजवळील ब्राऊन चेरी येथे पोचली. त्यावेळी मद्यपान केलेल्या चार ते पाच जणांनी वारकऱ्यांना रंग टाकण्याच्या कारणावरून  शिवीगाळ करीत त्यांच्यावर दारुच्या बाटल्या फेकल्या व १८ ते २० वारकऱ्यांना त्यांनी काठीने व दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती काही वारकऱ्यांनी जायखेडा येथील मूळ रहिवासी व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांना मोबाईलद्वारे कळवताच त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पोलिसांची मदत मिळून दिली. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात दिंडी देहूकडे रवाना करण्यात आली.

सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई
गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी कृष्णाई प्रतिष्ठान व परिसरातील वारकऱ्यांकडून करण्यात येत होती. पोलिसांनी सी. सी. टी. व्ही. आधारे तिघांना ताब्यात घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT