Bogus Doctors esakal
नाशिक

नाशिक : जिल्हा रुग्णालयात फिरणाऱ्या 'त्या' तीन बोगस डॉक्टरांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्षेत (OPD) तीन महिला डॉक्टर म्हणून वावरत असताना आढळून आल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाने (District Hospital) तक्रार करताच तिघा संशयित महिला डॉक्टरांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी एका महिलेकडून स्टेथोस्कोप (Stethoscope) जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मंगळवारी (ता. ५) जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील बाह्यरुग्ण विभागात तीन संशयित महिला या डॉक्टरांसारखे कपडे परिधान करत वावरत होत्या. यात एका महिलेच्या गळ्यात स्टेथोस्कोपदेखील होता. याचवेळी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य परिचारिका यांना या तिघींवर संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, तिघींनी आम्हाला निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी कामावर रुजू केल्याचे सांगितले. त्यांचे उत्तर ऐकून परिचारिकेस संशय आला. त्यांनी तातडीने तिन्ही महिलांना रुग्णालय व्यवस्थापनाकडे नेले. त्याचवेळी या महिला बनावट व संशयास्पद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

त्यातील एका महिलेकडे स्टेथोस्कोपही आढळून आला. दरम्यान, या तिघा महिलांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र या महिला रुग्णालयात का आल्या होत्या? त्या कधीपासून येथे येत आहे? यासारखे प्रश्‍न तयार झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून यातील एक संशयित महिला ही परिचारिका (Nurse) असल्याची माहिती पुढे आली आहे. अर्चना केदारे, मेघा शेट्टी, वर्षा लोंढे अशी या संशयित महिलांची नावे आहेत.

"जिल्हा रुग्णालयातर्फे असे कुणाही बाहेरच्या डॉक्टरांची नियुक्ती किंवा बोलविण्यात आलेले नाही. त्यामुळे या महिलांवर संशय आल्याने त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. संशय बळावल्याने त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे."

- किशोर श्रीवास, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

Viral Video: प्रचंड लाटांमध्ये मुलगा वाहून गेला; 16 वर्षीय तरुणाचा थरारक रेस्क्यू कॅमेऱ्यात, समुद्राच्या भीषण लाटांशी झुंज

Latest Live Updates Marathi : शिर्डीत गुरु पौर्णिमा उत्सवाला सुरूवात

Koyna Dam Update : 'कोयना' शतकाकडे! धरणात 24 हजार क्युसेकने पाण्याची आवक; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, नवजात 394 मिमी पाऊस

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

SCROLL FOR NEXT