Onion field destroyed by hail esakal
नाशिक

Rain Update : चांदवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा

रेडगाव खुर्द (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यात शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. आसरखेडे गावाच्या निम्म्या भूभागावर जोरदार गारपीट झाल्याने या ठिकाणी पिके पूर्णपणे गारांनी खरडली जाऊन नुकसान झाले. तालुक्यात महिनाभरापासून पडत असलेला पाऊस चांदवडकरांची पाठ सोडायला तयार नसल्याने चांदवडची कांदापंढरी उद्धव झाली आहे.

बाजीराव रकीबे यांच्या गाईवर बाभळीचे झाड पडल्याने गाय दबली जाऊन बेशुद्ध झाली.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आसरखेडे, मतेवाडी, देणेवाडी, मंगरूळ आदी गावांत वादळी पाऊस झाला. त्यात प्रामुख्याने आसरखेडे येथे सर्वाधिक नुकसान झाले. येथील बाजीराव रकीबे यांच्या गाईवर बाभळीचे झाड पडल्याने गाय दबली जाऊन बेशुद्ध झाली. मात्र, प्रसंगावधान राखत शेतकऱ्यांनी फांद्या तोडून गायीला बाहेर काढले.

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे पोल, शेड उडाले. जोराचा वारा असल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. गारांमुळे कांदा पिकाला पातच राहीली नाही. उसाचेही नुकसान झाले. यामुळे शेतकरी हतबल झाला असून, तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत होणार बदल, 'असे' असेल स्वरुप

MLA Monica Rajale: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २०८ कोटी मंजूर: आमदार मोनिका राजळे; दिवाळीपूर्वी रक्कम खात्यात वर्ग होणार

Karnataka Politics : ठरलं...! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे नेमकं काय म्हणाले...

प्रेमाची गोष्ट 2 मध्ये स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम घालणार धुमाकूळ ! रिलीजपूर्वीच जोडीची चर्चा

India Afghanistan relations: अफगाणिस्तानातील भू-राजकीय वर्चस्वाच्या लढाईत भारताची भूमिका

SCROLL FOR NEXT