ration ( file photo ) 
नाशिक

Nashik News : बागायतदारांवर रेशन अन्‌ विकतचा गहू खाण्याची वेळ; येवल्यात ‘रब्बी’चा पालापाचोळा

पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रात थोड्याफार प्रमाणात रब्बी हंगाम फुललायं. मात्र, उत्तर पूर्व भागात शेतजमीन ओसाड पडली आहे.

संतोष विंचू

Nashik News : मागील वर्षी वरूणराजाने अवकृपा केल्याने तालुक्यात खरिपाची वाट लागली. आता रब्बीचे चित्र त्याहूनही भयानक आहे. पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रात थोड्याफार प्रमाणात रब्बी हंगाम फुललायं. मात्र, उत्तर पूर्व भागात शेतजमीन ओसाड पडली आहे.

पिण्यासाठी साठवर गावे-वाड्यांवर टँकर सुरू असल्याने गव्हाचे पीकही दिसेनासे झाले आहे. (Time to ratio and sell wheat to farmers in yeola nashik news)

एरवी बागायतदार म्हणणाऱ्यांना या वर्षी विकत आणि रेशनमधून गहू घेऊन खाण्याची वेळ आली आहे. चांगल्या प्रतीचा गहू मिळत असल्याने सर्वसामान्य कुटुंब ‘रेशन’मधून, तर अनेक शेतकरी मार्केटमधून गहू घेत आहेत. तालुक्यातील शेती आठमाही असून, पाऊस पडला तर खरीप व रब्बी हंगाम हाती येतात. यंदा खरिपात रिमझिम पाऊस झाला.

मुसळधार पाऊस न झाल्याने नदी, नाले कोरडे राहिले. उत्तर पूर्व भागात विहिरी कोरड्याठाक राहिल्या. ज्यांना पाणी उतरले, तेही दिवाळीनंतर आटले. या वर्षी खरीप हंगामात मका, सोयाबीन, भुईमूग, कपाशीसह प्रमुख पिकांची वाहतात झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे. दिवाळीनंतर धो धो पाऊस पडून रब्बी हंगाम चांगला येईल, ही अपेक्षा फोल ठरल्याने आता तालुका होरपळून निघत आहे.

शासनाने तालुका दुष्काळ जाहीर केला आहे. तालुक्यात गव्हाचे सुमारे सहा ते सात हजार हेक्टरच्या आसपास होते. यंदा तीन हजार १४९ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. उत्तर पूर्व भागात नाममात्र गहू पिकला. तालुक्याच्या शासकीय नोंदीत १२४ पैकी ५२ गावे रब्बीची आहेत. भौगोलिक विषमतेमुळे दुभंगलेल्या अवर्षणप्रवण दुष्काळी तालुक्यात यंदा रब्बीचे चित्र विषम बनले आहे.

पर्जन्यराजाने अवकृपा केल्याने खरिपालाच पाणी नव्हते, आज अनेक गावांत प्यायलाही पाण्याचा वानवा आहे. अशा स्थितीत रब्बी हंगामाचा खेळ होऊन यंदा ‘खो’ बसला आहे. पालखेड डाव्या कालव्याला फक्त महिनाभराचे एक आवर्तन मिळाले. मात्र, उपलब्ध पाण्यावर कांद्याची लागवड अधिक असल्याने गव्हाचे पीक नाममात्र आहे.

रब्बी क्षेत्रात निम्य्याने घट

पश्चिम भागात असलेल्या पाण्यावर, तर उत्तरपूर्व भागात आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक जगविण्याला प्राधान्य दिले. काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड करून त्यासाठी शेततळ्याचे पाणी वापरले. पाणी नसलेल्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली आहे.

त्यामुळे सर्वाधिक क्षेत्रात हरभरा दिसत असून, चार हजार १३६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. मकाची २ हजार ७८८ हेक्टरवर लागवड झाली असून, ज्वारी अवघी ५८० हेक्टरवर घेतली आहे. आता पाणीटंचाईमुळे पिके वाया जाण्याची भीती आहे.

अशी आहे रब्बीची पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक- सरासरी क्षेत्र- पेरणी

ज्वारी - ४३९ - ५८०

गहू - ६३५१ - ३१४९

मका - २७८ - २७८८

हरभरा - ४२५३ – ४१३६

एकूण - ११७८३ – १०६३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT