Employees trimming trees in the hazardous area of ​​the East Divisional Office building. esakal
नाशिक

Nashik News : पूर्व विभागीय कार्यालयाच्या धोकादायक भागाच्या दुरुस्तीस मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयाच्या धोकादायक भागाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेस अखेर मुहूर्त सापडला. धोकादायक भागात वाढलेल्या वृक्षापासून कामाची सुरवात करण्यात आली आहे. कार्यालयाची भिंत आणि कार्यालय पहाडमुक्त दिसणार आहे. (Time to repair dangerous part of Eastern Divisional Office Nashik News)

ब्रिटिशकालीन पूर्व विभागीय कार्यालयाची इमारतीच्या मागील बाजूच्या भिंतीत पिंपळाचे वृक्ष वाढले होते. त्यामुळे भिंतीस मोठा तडा गेला आहे. चार वर्षांपूर्वी मुसळधार पावसात त्यातील दगड कोसळण्याची घटना घडली होती.

अन्य भागही मोठ्या प्रमाणावर धोकादायक झाला होता. भविष्यात त्यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. मंगळवारी (ता.७) धोकादायक भाग दुरुस्तीस महापालिकेला मुहूर्त सापडला.

ठेकेदाराकडून सर्वप्रथम खचलेल्या भागातील वृक्षतोड करत धोकादायक भाग दुरुस्ती कामाची सुरवात केली. पूर्व विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह धोकादायक भाग परिसरातील व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

पंधरा ते वीस दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती ठेकेदाराकडून देण्यात आली. परंतु इमारतीच्या दुरवस्थेमुळे आणि इमारतीची भिंत खचण्याचा प्रकाराने नाराजीचे सूर पसरले होते.

धोकादायक भागाची दुरुस्ती करण्याऐवजी त्यास मुरूम आणि वाळू भरलेल्या गोण्यांचा पहाड बनवून टेका देण्यात आला होता. पहाडही काही वर्षांनी धोकादायक झाला. प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामास सुरवात झाल्याने पहाड हटवण्यात येणार असल्याने इमारत पुन्हा एकदा पहाडमुक्त होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT