Ozar airport
Ozar airport esakal
नाशिक

Nashik : तिरुपती- शिर्डी- नाशिक धार्मिक कॉरिडॉर शक्य

विक्रांत मते

नाशिक : मुंबई- पुणे- नाशिक विकासाच्या सुवर्ण त्रिकोणातील नाशिकची बाजू विमानसेवा (Airoplane service) नसल्याने कमकुवत आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहराचा विकास झपाट्याने होवू शकतो. त्याला कारण म्हणजे भौगोलिक स्थान, पाणी व जमिनीची उपलब्धता व स्वच्छ हवामान. परंतु, राजकीय पाठबळ (Political Support) मिळत नसल्याने विकास झाला नाही. अद्यापपर्यंत जो काही विकास झाला आहे, तो नैसर्गिक पद्धतीने म्हणजे खासगी कंपन्यांना (Private Companies) नाशिकच्या क्षमतांची जाणीव झाल्याने विकासाचा पहिला टप्पा गाठला गेला. (Tirupati Shirdi Nashik religious corridor possible ozar airport Nashik News)

आता वेगाने विकास करायचा झाल्यास त्यासाठी विमानसेवेची गरज आहे. विमानसेवेसंदर्भात इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमान तळ होण्याची ओझर विमानतळाची क्षमता आहे. विमानसेवेच्या क्षमता मांडत असताना आता धार्मिक पर्यटनाचा मुद्दा समोर आला आहे. नाशिकमधील डॉक्टरांनी ‘सकाळ’ कडे दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये धार्मिक पर्यटनाला विमानसेवेमुळे चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली. त्यात तिरुपती, शिर्डी व नाशिक धार्मिक पर्यटनाचा कॉरिडॉर मागणी नोंदविण्यात आली. तिरुपती- शिर्डी- नाशिक- त्र्यंबकेश्‍वरसाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. त्यानुसार विमान सेवा सुरू केल्यास धार्मिक पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.

"नाशिकच्या विकासाला चालना मिळण्यासाठी विमानसेवा सुरू होणे गरजेची आहे. नाशिक शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात देशातील महत्त्वाच्या शहरांशी विमानसेवेने शहर जोडले गेले होते. त्यामुळे इतर शहरातील नागरिकांची नाशिक मध्ये ये- जा सुरू होती. नाशिकची विमानसेवा १०० टक्के परवडणारी आहे. शिर्डी विमानतळ असले तरी भाविक मोठ्या प्रमाणात नाशिकला येतात. त्या अनुषंगानेदेखील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. नाशिक- शिर्डी कनेक्टिव्हिटी झाल्यास विमानतळाचा उपयोग होईल. वाइन कॅपिटल ही नाशिकची जमेची बाजू आहे. युरोपमध्ये पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले गेल्याने त्यातून नागरिक स्वयंपूर्ण बनले. त्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे."

- डॉ. अतुल वडगावकर.

"ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरळीत होती, त्याचा लोक फायदा घेत होतो. देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी सेवा असल्याने लोकांना त्याचा फायदा होत होता. वेगाने कामे होत होती. कोरोनामुळे दिल्ली फ्लाइट बंद करण्यात आल्यानंतर विमानसेवेला घरघर लागली. अहमदाबाद, हैदराबाद सेवा बंद होत गेल्या. आश्‍वासने भरपूर मिळाली, परंतु प्रत्यक्षात सेवा सुरू झाली नाही. नाशिकमध्ये औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. फुलांचे मोठे उत्पादन होते. फूड क्लस्टर म्हणून लौकिक आहे. शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. त्यामुळे विमानसेवा गरजेचीच आहे. दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई, पुण्याशिवाय पर्याय नाही. नाशिकहून थेट सेवा हवी. उडान योजनेंतर्गत प्रवासी मिळत असतानाही हवाई सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याने दुर्दैव म्हणावे लागेल. सक्षम राजकीय नेतृत्व नसल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल." - डॉ. राहुल पिंगळे.

"नाशिक शिक्षणाची उपराजधानी असली तरी नाशिकमधूनदेखील मोठ्या प्रमाणात दक्षिण भारत व परदेशात शिक्षणासाठी मुले जातात. त्या मुलांना शिक्षणासाठी विमानसेवेने पाठविण्याशिवाय पर्याय नाही. परंतु, त्यासाठी नाशिकहून ॲक्सेस हवा. मुंबई, पुण्याशिवाय पर्याय नाही. नाशिकमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असतानाही त्याचा उपयोग करून घेतला जात नाही. यात राजकारण करण्याची आवश्‍यकता नाही. नाशिक धार्मिक शहर आहे. आता वाइन कॅपिटल म्हणून नव्याने ओळख निर्माण झाली आहे. याचा विचार करून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तसेच निरंतर विमान सेवा सुरू झाली पाहिजे." - डॉ. मीनल रणदिवे.

"नाशिक शहर सर्वच अंगांनी पुढारलेले आहे. औद्योगीकरण वाढत आहे, वाइन कॅपिटल म्हणून नाशिकचे नाव जगभर प्रसिद्ध होत आहे. फूड प्रोसेसिंग युनिट नाशिकमध्ये तयार होत आहे. नाशिकमधील मुलांना देशभरात मागणी आहे. शिक्षणाची राजधानी म्हणून नाशिक पुढे येत आहे. नाशिकमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असतानादेखील विमानसेवा निरंतर सुरू होत नाही, हे दुर्दैव आहे. सरकारने प्रयत्न केल्यास विमानसेवा सुरळीत होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतील. त्यातून विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. नाशिकमध्ये मेडिकल टुरिझमला चांगली संधी आहे. त्यासाठी विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे." - डॉ. रवींद्र पटणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT