Scenes from the play 'To Rajahans Ek' esakal
नाशिक

Nashik: ‘तो राजहंस एक’ आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्यमहोत्सवात! नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; 14 फेब्रुवारीला सादरीकरण

२३ वा भारंगम हा एनएसडी आयोजित महोत्सव १ ते २१ फेब्रुवारी यादरम्यान नवी दिल्ली व भारतातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये होत आहे..

प्रतीक जोशी

नाशिक : ‘तो राजहंस एक’ या दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित असलेल्या नाटकाला नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आयोजित २३ व्या भारतीय रंग महोत्सव अर्थात ‘भारंगम’ या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

‘सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान, नाशिक यांनी नाटकाची निर्मीती केली आहे. (To Rajhans Ek at International Bharangam Theater Festival Presentation on 14 February Nashik)

२३ वा भारंगम हा एनएसडी आयोजित महोत्सव १ ते २१ फेब्रुवारी यादरम्यान नवी दिल्ली व भारतातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये होत आहे. या महोत्सवात देशविदेशातील निवडक नाटक सादर केली जातात.

भारंगम महोत्सवाची निवड समिती त्यांच्याकडे आलेल्या प्रवेशिकांमधून परीक्षण करून नाटकांची निवड करते.

परंतु ‘तो राजहंस एक’ या महाराष्ट्रात वर्षभर गाजत असलेल्या आणि महेश एलकुंचवार, राजीव नाईक, सतीश आळेकर, मोहन आगाशे यांसह अनेक दिग्गजांनी व समीक्षकांनी गौरवलेल्या नाटकाला भारंगमच्या विशेष सल्लागार समितीने थेट महोत्सवात हे नाटक सादर करण्याचे निमंत्रण दिले आहे. हे नाटक भारंगम महोत्सवात नवी दिल्लीत १४ फेब्रुवारीला सादर होईल.

नाशिकमधील याच नाट्यसंचातील ‘हंडाभर चांदण्या’ या प्रायोगिक नाटकाला आणि नाशिकचे प्राजक्त देशमुख लिखित ‘संगीत देवबाभळी’ या व्यावसायिक नाटकालाही यापूर्वी हा बहुमान प्राप्त झाला होता.

‘मानसिक आरोग्य’ किंवा ‘मनाचे आजार’ यावरील सामाजिक सजगता निर्माण करण्यासाठी साताऱ्यातील परिवर्तन या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी झालेल्या मानसरंग प्रकल्पांतर्गत, तसेच ज्येष्ठ नाटककार व अभ्यासक राजीव नाईक,

ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर, नाटककार चंद्रशेखर फणसाळकर, मानसशास्त्रतज्ज्ञ डॉ. अंजली जोशी यांच्या मार्गदर्शखाली मानसरंग उपक्रमात दिग्दर्शक सचिन शिंदे यांना मिळालेल्या विशेष शिष्यवृत्तीतून ‘तो राजहंस एक’ या नाटकाची निर्मिती झाली आहे.

सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय, आर्थिक समतोल राखण्याच्या अपयशातून एका पस्तीशीतल्या स्वत्व हरवलेल्या संवेदनशील शेतकरी तरुणाची कथा या नाटकातून मांडली आहे.

या नाटकात नाट्यलेखक व ‘देवबाभळी’कार प्राजक्त देशमुख आणि अभिनेत्री अनिता दाते यांच्या समवेत अमेय बर्वे, धनंजय गोसावी, हेमंत महाजन, राजेंद्र उगले, प्रणव प्रभाकर यांच्या भूमिका आहेत. सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड निर्माते असून, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित व प्रणव सपकाळे यांची असून, संगीत रोहित सरोदे यांचे असून, अथर्व मुळे यांचे संगीत संयोजन आहे.

चेतन बर्वे व लक्ष्मण कोकणे यांचे नेपथ्य, तर आर्टवर्क व जाहिरात संकल्पना सुप्रिया देशमुख यांची आहे. रंगमंच व्यवस्था राहुल गायकवाड सांभाळतात.

"मुळात ‘तो राजहंस एक’ या नाटकात आपले वास्तव जगणे आणि त्यातील विभ्रम याच्या सीमारेषेवरील एक विलक्षण गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते. भारंगम महोत्सवातील निवडीमुळे या नाटकाचा आशय आता राष्ट्रीय पातळीवर पोचेल, याचा आनंद आहे."

- अनिता दाते-केळकर, अभिनेत्री

"नवी दिल्लीच्या भारंगम महोत्सवात नाटकाची निवड होणं हे प्रत्येक नाट्यकर्मीचे स्वप्न असते. परंतु केवळ निवडच नव्हे, तर नाटकाला विशेष सन्मानाने निमंत्रित केल्याने खूप आनंद होत आहे."- प्राजक्त देशमुख, नाटककार, अभिनेता

"हंडाभर चांदण्यानंतर आता ‘तो राजहंस एक’ हे नाटकही भारंगम महोत्सवात निमंत्रित झाल्याने आमच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना एक प्रकारे शाबासकीच मिळाली आहे. ही घटना खूप बळ देणारी आहे. नाटक घडत राहो."- सचिन शिंदे, दिग्दर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT