Smoking News
Smoking News esakal
नाशिक

Smoking News : शहरभर सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; तंबाखूच्या पिचकाऱ्या अन्‌ सिगारेटचा धूर सुरूच

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने मुखाचा, छातीचा, आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते.

त्यामुळे या पदार्थांच्या सेवनापासून परावृत्त करण्यासाठी शासनस्तरावरून प्रबोधनात्मक उपाययोजना तर कायदेशीर दंडात्मक कारवाईचाही बडगा उगारला जातो.

असे असले तरी, जागतिक तंबाखूसेवनविरोधी दिनी सेवाभावी संस्थांकडून विविध उपक्रम राबवून सामाजिक प्रबोधन एकीकडे केले जात असताना, त्याचवेळी टपऱ्यांवर गुटख्याच्या पिचकाऱ्या अन्‌ सिगारेटचा हवेत धूर सोडणाऱ्यांचीही उणीव नव्हती. असा विरोधाभास आज पहावयास मिळाला. (Tobacco sales rampant across city Tobacco spray and cigarette smoke continue Nashik News)

आज नाशिकमध्येच नव्हे तर जगभर जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने टोबॅको फ्री सोसायटीसाठी वर्षभर झटणाऱ्या सेवाभावी संस्थांकडून प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले.

ठिकठिकाणी भित्तिपत्रकांचे प्रदर्शन भरवून त्या माध्यमातून समाजातील तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्याचप्रमाणे काही सेवाभावी संस्थांतर्फे प्रबोधनात्मक पथनाट्याचेही सादरीकरण होते आहे. यातून समाजातील युवा वर्ग या व्यसनापासून परावृत्त व्हावा, त्याला या पदार्थांपासून होणाऱ्या गंभीर आजारांची जाणीव व्हावी हाच उद्देश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, याउलट चित्र शहरात दिसून आले. नेहमीप्रमाणेच, चहाच्या टपऱ्यांबाहेर हाताच्या बोटांमध्ये सिगारेटचा धूर हवेत सोडणारे, पानटपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी करण्यासाठी नेहमीप्रमाणेच पैसे देऊन तीळ-तीळ मृत्यूच्या पुड्या खरेदी करीत होते.

सार्वजनिक ठिकाणी हे सारे सुरू असताना मात्र त्याविरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांविरोधात जागेवर दोनशे रुपयांचा दंड ठोठावला जातो.

परंतु प्रत्येक शासकीय इमारतींचे कोपरे गुटख्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले असतात अन् परिसरात रिकाम्या पुड्यांचा खचही पहावयास मिळतो. अगदी पोलिस ठाणे अन्‌ सरकारी रुग्णालयेही यापासून वंचित राहिलेले नाही.

एकीकडे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकांकडून सातत्याने प्रतिबंधित गुटख्यांची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच, दुसरीकडे तरीही शहरभर सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होतेच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT