admission to agricultural courses 
नाशिक

कृषी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश नोंदणीची आज अंतिम मुदत 

अरुण मलाणी

नाशिक : एमएचटी- सीईटी परीक्षेच्‍या गुणांवर आधारीत बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमासह अन्‍य कृषी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष पदवीच्‍या प्रवेशासाठी नोंदणीप्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागू नये, यामुळे नोंदणी प्रक्रियेची मुदत वाढविली होती. या वाढीव मुदतीनुसार विद्यार्थ्यांना बुधवार (ता. २३) पर्यंत संकेतस्‍थळावर नोंदणी करण्याची अंतिम मुदत असणार आहे. 

कॅप राउंडमध्ये सहभागासाठी नोंदणी बंधनकारक 

कृषी पदवी, कृषी अभियांत्रिकी (बी. टेक.) यांसह कृषी शाखेतील अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांशी संलग्‍न महाविद्यालयांत प्रवेशासाठी या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्‍यक आहे. कॅप राउंडमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया गेल्‍या ९ डिसेंबरला सुरू झाली होती. यापूर्वी जारी केलेल्‍या वेळापत्रकानुसार नोंदणीची मुदत १६ डिसेंबरपर्यंत होती. विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, याकरिता नोंदणी मुदतीत वाढ केलेली होती. त्‍यानुसार उद्यापर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्‍थळावर नोंदणी करण्यासह आवश्‍यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरम्‍यान, या पुढील कॅप राउंडचे सविस्‍तर वेळापत्रक तीन दिवसांत जारी केले जाणार आहे.

४४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणीप्रक्रिया राबविली

राज्‍यस्‍तरावर आतापर्यंत ४४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणीप्रक्रिया राबविली आहे. यापैकी ३२ हजार २११ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. सुविधा केंद्र (एफसी)च्‍या माध्यमातून १५ हजार ४८२ अर्ज मंजूर केलेले आहेत. सहा हजार १९६ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

SCROLL FOR NEXT