Toll plaza at Ghoti will be closed nashik marathi news 
नाशिक

घोटी टोलनाक्याला लागणार टाळे! ग्रामपालिकेकडून कारवाईचा बडगा 

पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोलनाक्याला सोमवार (ता.१८) टाळे लावणार असल्याचे अधिकृत पत्र आज (ता. १५) घोटी ग्रामपालिकेने टोलनाका प्रशासनाला दिले आहे. टोलनाका ग्रामपालिकेला घरपट्टी कराची रक्कम देत नसल्याने त्याला टाळे ठोकण्याचा ग्रामपालिकेने इशारा दिला आहे. 

ग्रामविकास अधिकाऱ्यांची माहिती

या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम २४ महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० भाग २ पोट नियम १५ अन्वये शासन निर्णय ११ डिसेंबर १९१५ नुसार निवासी व व्यावसायिक बांधकामाची कर आकारणी केल्यानुसार टोलनाका, स्टोअररूम, टोलनाका शेड मिळकत क्रमांक ३८९८ ची मागील थकबाकी ७०६, ५४० व चालु ८५,५८० एकूण ७९२,३२० रक्कम भरलेली नाही. याबाबत घोटी ग्रामपालिका कार्यालयाने २५ सप्टेंबर २० रोजी नोटिशीद्वारे टोलनाका प्रशासनाला कळविले होते. मात्र, अद्यापपर्यंत रक्कम अदा केली नसल्यामुळे कारवाईचा बडगा ग्रामपालिकेने उगारला आहे. एकूण ७ लाख ९३ हजार ३२० रक्कम वसूल करण्यासाठी घोटी ग्रामपालिका १८ जानेवारीला घोटी टोलनाक्यास टाळे ठोकणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी धुंदाळे यांनी दिली. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्याच्या घामाची थट्टा! २-३ लाख खर्चून पिकलेला १२ क्विंटल कांदा नेला बाजार समितीत, विक्रीनंतर खिशातला रुपया देण्याची वेळ

LSG vs RCB Live: ९ चौकार, ८ षटकार! मिचेल मार्शचे वादळी शतक, बंगळुरूची धुलाई

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोरेगावच्या जंगलात भीषण आग

Matheran Traffic Issue : माथेरानला जाताय? आता पार्किंगचं टेन्शन मिटलं! दस्तुरी नाक्यावर पर्यटकांसाठी 'ही' खास सोय, पहा काय आहे नवा प्लॅन

पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, खरंच कलिंगड खाल्ल्यामुळे दुर्दैवी घटना घडली का? धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT