tomatoes
tomatoes 
नाशिक

आर्थिक कोंडीतील शेतकऱ्यांना टोमॅटोचा आधार; प्रतवारी व दर्जानुसार दोनशे ते साडेचारशे रुपये दर 

रामदास कदम

दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील शेतकरी यंदा तीव्र अडचणीत सापडला होता, तसेच अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता टोमॅटोने सुरवातीपासून आजपर्यंत भाव टिकून राहिल्याने आर्थिक आधार दिला आहे. 

दिंडोरी तालुक्यात एप्रिलमध्ये द्राक्षपिकाचे भाव पाच रुपये प्रतिकिलो इतके खाली आल्याने द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला होते. तसेच परतीच्या पावसामुळे पूर्व व पश्चिम भागात विविध खरिपाच्या पिकांची वाताहत झाली. नुकसानीचे पंचनामे, भरपाईची मागणी याबाबत सर्वच स्तरांवरून पाठपुरावा सुरू आहे. तालुक्यातील द्राक्षबागांसह भात, नागली, वरई ही पिकेही धोक्यात आली आहेत. टोमॅटो पिकाचेही नुकसान झालेच आहे. मात्र तुलनात्मक कमी असले तरी सध्या टोमॅटोला असलेले दर नाहीपेक्षा बऱ्यापैकी असल्याने टोमॅटो उत्पादकांना तेवढाच आधार आता उरला आहे. सुमारे दोनशे ते साडेचारशे असा दर प्रतवारी व दर्जानुसार उत्पादकांना मिळतो आहे. 

प्रतिदिवशी सुमारे २५ ट्रक टोमॅटो विक्री

तालुक्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. नुकसान झाल्यानंतर दुबार लागवड झाली होती. पावसाच्या तडाख्यात काही उत्पादकांचे नुकसान झाले. मात्र तरीही अशा प्रसंगाला सामोरे जाऊन बहुतांशी उत्पादकांनी हे पीक जगविण्यासाठी आर्थिक अतिरिक्त भार सोसला आहे. दरम्यान, वणी-सापुतारा रस्त्यावरील बाजार समितीच्या उपबाजारात व खोरीफाटा भागात टोमॅटो खरेदी-विक्री केंद्र सुरू झाले आहे. सद्यःस्थितीत मोठी आवक टोमॅटोची होते आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील व्यापारी खरेदीचे व्यवहार करत आहेत. टोमॅटो प्रतवारी, पॕकिंग, ट्रकमध्ये टाकण्याचे काम परप्रांतीय कामगार करतात. व्यापाऱ्यांनी हे कामगार सोबतच आणले आहेत. तसेच स्थानिक व्यापारीही टोमॅटो खरेदी करून परराज्यात पाठवीत आहे. प्रतिदिवशी सुमारे २५ ट्रक टोमॅटो परराज्यात विक्रीसाठी जात आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापाऱ्यांनी दिली. मोठी आर्थिक उलाढाल यानिमित्ताने होते आहे. टोमॅटो खरेदी-विक्री व्यवहार प्रणालीमुळे वणी-सापुतारा रस्त्याला यात्रेचे स्वरूप आले आहे. ट्रॅक्टर, पिक-अप जीप, छोटा हत्ती अशा विविध वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, सद्यःस्थितीत टोमॅटोला मिळणाऱ्या दरामुळे उत्पादकांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT