woman harrassment esakal
नाशिक

विम्याच्या रकमेसाठी विधवा महिलेचा छळ; जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रमोद पाटील

चिचोंडी (जि.नाशिक) : मृत पतीच्या विम्याचे पैसे व पीएफमधील (insurance money and pf) दहा लाख रुपये द्यावेत, यासाठी महालखेडा (ता. येवला) येथील विधवा मनीषा संजय नागरे (वय ३६) हिला सासरच्या मंडळीने मारहाण करून तिचा अमानुष छळ केला. गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध झाली असताना, ती मृत झाली, असे समजून सासरच्या लोकांनी तिला स्वतःच्या कारमधून भिंगारे (ता. येवला) रोडच्या कडेला निर्जनस्थळी टाकून दिले. तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.

बेशुद्धावस्थेत मनीषा खासगी रुग्णालयात दाखल

सकाळी संबंधित महिलेच्या माहेरच्या लोकांना या घटनेबद्दल कळताच त्यांनी बेशुद्धावस्थेत मनीषाला येवला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मनीषा संजय नागरे यांच्या तक्रारीवरून दीर सुनील नामदेव नागरे, सासू जनाबाई नामदेव नागरे, वंदना सुनील नागरे, मुलगा समर्थ संजय नागरे आणि वाहन चालक सुनील जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, संशयितांना अटक करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT