Rare plant and Caves found in Kativ Kapari of Ramshej  esakal
नाशिक

Nashik News : रामशेजच्या कड्या-कपारीत 11 गुहा; दुर्गसंवर्धकांचा तीन गटांकडून शोध

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १६९ व्या दुर्गशोध अभ्यास मोहिमेत दुर्गसंवर्धकांनी रामशेजच्या कड्या-कपरींचा चहूबाजूने अभ्यासात्मक शोध घेतला. (total of 11 caves were found in natural impervious rock of Ramshej fort nashik news)

त्यात रामशेजच्या नैसर्गिक कातीव अभेद्य कड्याच्या पोटात एकूण ११ गुहा आढळल्या, तर चहूबाजूने अतिशय दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्ष व विविध पक्षी आढळले. या वेळी दुर्गसंवर्धकांनी तप्त उन्हात तीन गट तयार करून दिवसभरात ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली, अशी माहिती शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्गअभ्यासक राम खुर्दळ यांनी दिली.

मोहिमेत रामशेजच्या चहूबाजूने ज्ञात-अज्ञात ऐतिहासिक, नैसर्गिक पाऊलखुणा व दुर्मिळ जैवविविधतेची शोध अभ्यास मोहीम झाली. या मोहिमेत तीन गट केले. एक गट रामशेजच्या कपरींचा सुरक्षित शोध घेत, तर दुसरा मध्यभागी जलस्त्रोत शोध व तिसरा चहूबाजूने दुर्मिळ वनस्पती शोध घेत होते. त्यात रामशेजच्या कपारीत ११ गुहा आढळल्या.

मध्यभागी विविध घळीत कातीव असंख्य दगड, गोलाकार दगडी आढळल्या, तर किल्ल्याच्या चहूबाजूने पिंपळ, बाभूळ, काटे-साबर, भोकर, दैवस, अडुळसा, गुर्तुली, शेकडो वर्षे जुने उंबराचे झाड, चिंच, चिलार, अडुळसा, कोरपड, साबर, हिवर, सिंदल, चाफा, करवंद, रानमोगरा तसेच पश्चिम पोटात वन विभागाने लावलेली बांबू व सागाची काही झाडेही आढळली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या वृक्षात बहुतांश दुर्मिळ वनस्पती औषधी प्रकारातील आहेत. काही फुले, फळे देणारी व काही जाळी, कुंपण तयार करणारे वृक्ष आहेत. दरम्यान, याठिकाणी दर वर्षी लागणाऱ्या वणव्यामुळे या दुर्मिळ वनस्पतींसोबतच येथील मोर, दुर्मिळ लाहुरी पक्षी, गुहेत असणारा ससाणा विस्थापित होत आहे.

दरम्यान, रामशेज युद्धात वापरलेले दगड-गोटे अधिक प्रमाणात किल्ल्याच्या चहूबाजूने दिसतात, तर किल्ल्यावर कातलेली बांधकामाची असंख्य दगडं घळीत पडलेली आहेत. मोहिमेच्या अखेरीस येत्या १४ मेस रामशेजच्या माथ्यावर गोमुखीद्वारात होणाऱ्या छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव नियोजन बैठकीत विविध जबाबदारीचे प्रयोजन करण्यात आले.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या रामशेज दुर्ग अभ्यास शोधमोहिमेत श्री. खुर्दळ, संयोजक समितीचे भूषण औटे, किरण दांडगे, पर्यावरण वृक्ष अभ्यासक भारत पिंगळे, दुर्मिळ वनौषधी व वृक्ष अभ्यासक शिवाजी धोंडगे, ऐतिहासिक वास्तू अभ्यासक मनोज अहिरे, दुर्गसंवर्धक हेमंत पाटील, वैभव मावळकर, राम पाटील, कार्तिक बोगावर यांसह सदस्यांचा सहभाग होता.

"रामशेजच्या अभेद्यतेचे कातीव कड्यातील पोटात असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यात यश आले आहे. एकूण ११ पुरातन, नैसर्गिक गुहा आढळल्या. त्यात सैनिक टेहळणीसाठी बसू शकतील व याठिकाणी वन्यजीवही आश्रयास असू शकतील, अशा त्या गुहा आहेत.

आजूबाजूला अनेक दगडी गोलाकार गोटे, कातीव दगड बघता युद्धात गोफणीत वापरलेली, शत्रूवर फेकलेली ही गोलाकार दगडं असू शकतात, तसेच काही ठिकाणी खडकात विविध स्फटिके आढळली. रामशेज किल्ला राज्य संरक्षित स्मारक कधी होणार, याकडे गांभीर्याने राज्य पुरातत्त्व विभागाने लक्ष घालावे, आम्ही ‘शिवकार्य’तर्फेही याबाबत पत्र दिले. पुरातत्त्व विभागाने मागणीसोबत पाठपुरावा करणेही आवश्यक आहे." -मनोज अहिरे, अभ्यासक, ऐतिहासिक वास्तू समिती

"करवंदे गुर्तुली ही काटेरी जाळी तयार करते. मात्र गुर्तुली खोकल्यावर गुणकारी आहे. कडुनिंब, चिलार, अडुळसा, अशी कित्येक वनौषधी दमा, खोकला, ताप यावर गुणकारी आहेत. ती जोपासणे आवश्यक. येथे लागणारा वणवा थांबवून, येथे वन विभाग सामाजिक संस्थांना सोबत घेऊन वनौषधी केंद्र होऊ शकते. मात्र यासाठी प्रशासनात इच्छाशक्ती हवी. आम्ही दुर्गसंस्था तर अनेकदा निवेदने देतो, त्याचे साधे उत्तरही येत नाही." -शिवाजी धोंडगे, वनौषधी वृक्षमित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: नोकरीचं स्वप्न भंगलं? सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेतलं म्हणून...; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल केला रद्द

Marriage Problems: विवाहासाठी योग्य स्थळे का सांगून येत नाहीत? वाचा सविस्तर

Daily Rashi Bhavishya: भाग्य, यश आणि आशीर्वाद! 'या' राशींच्या लोकांनावर असेल शनिदेवाची कृपादृष्टी, वाचा आजच राशीभविष्य

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

SCROLL FOR NEXT