ZP Nashik esakal
नाशिक

ZP गट गण प्रारूप रचनेवर हरकतींचा पाऊस; एकूण 93 हरकती

कुणाल संत

नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या (ZP Election) तयारीच्या दृष्टीने गट आणि गणाच्या प्रारूप रचनेवर (Group format) हरकती दाखल करण्याच्या बुधवारी (ता. ८) अखेरच्या दिवशी हरकतींचा पाऊस पडला. ४८ हरकती प्रशासनास प्राप्त झाल्या. यामुळे गट, गणाच्या प्रारूप रचनेवर एकूण ९३ हरकती आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. शुक्रवारी (ता.१०) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakishna Game) यांच्याकडे या हरकतींवर सुनावणी होणार आहे. (total of 93 objections on ZP group format ZP Elections Nashik News)

जिल्ह्यात ११ गट आणि २२ गण वाढले आहेत. यानुसार जिल्हा परिषदेत ८४ गट आणि पंचायत समितीच्या १६८ गणांची प्रारूप रचनेची अधिसूचना २ जून रोजी जाहीर करण्यात आली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट आणि गणाची प्रारूप रचनेवर हरकती नोंदविण्यासाठी प्रशासनाकडून ८ जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी अखेरच्या दिवशी ४८ हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २० हरकती निफाड तालुक्यातील गट-गणांवर आहेत. त्यानंतर सिन्नर तालुक्यात १८ व नाशिक तालुक्यात १३ हरकतींचा समावेश आहे. प्राप्त हरकती त्या- त्या तालुक्याच्या तहसीलदारांना पाठविण्यात येणार आहेत.

तालुकानिहाय हरकती

दिंडोरी : ९

निफाड : २०

बागलाण : ५

त्र्यंबकेश्‍वर : ७

चांदवड : ६

नाशिक : १३

सिन्नर : १८

मालेगाव : ८

कळवण : १

येवला : १

सुरगाणा : २

देवळा : १

नांदगाव : १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT