Maratha Reservation  esakal
नाशिक

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नावली भरताना होणार कसरत! अचूक मांडण्याचे प्रगणक, पर्यवेक्षकांसमोर आव्हान

एका अर्जामध्ये १४८ प्रश्नांचा समावेश असल्याने एवढी माहिती संकलित करून अचूकपणे मांडताना कसरत करावी लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी मंगळवार (ता. २३) पासून सुरू झालेल्या सर्वेक्षणात प्रश्नावली भरताना प्रगणक व पर्यवेक्षकांची चांगलीच दमछाक होत आहे.

एका अर्जामध्ये १४८ प्रश्नांचा समावेश असल्याने एवढी माहिती संकलित करून अचूकपणे मांडताना कसरत करावी लागत आहे. (tough exercise while filling Maratha Reservation Questionnaire challenge to supervisor to accurately present enumerators nashik)

२३ ते ३१ जानेवारी या कालावधीत मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे.

त्यासाठी जिल्ह्यात ११ हजार २३२ प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी कामकाज सुरू केले. पंचायत समितीस्तरावर मंगळवारी त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले.

प्रत्यक्षात बुधवार (ता. २४)पासून सर्वेक्षणाचे कामकाज होणार असले तरी प्रश्नांची संख्या विचारात घेता इतकी माहिती अचूकपणे भरली जाईल का, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

जिल्ह्यात दोन लाख आठ हजार कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यांना तत्काळ प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी गावनिहाय दवंडी देण्यात आली.

ग्रामसेवक, तलाठी यांनी गावातील व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. तसेच आता सर्वेक्षणही सुरू झाल्याने गावकऱ्यांना माहिती देण्यास सांगितले जात आहे.

सोशल मीडियाचा वापर

गावागावांत आता व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून मराठा सर्वेक्षण फॉर्म व्हायरल केले जात आहेत. कुठल्या स्वरूपाचे उत्तर देणे अपेक्षित आहे, याविषयी माहिती पुरवली जाते. त्यामुळे प्रश्नांची संख्या १४८ दिसत असली तरी उत्तरे देणे थोडे सोपे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT