Workers collecting garbage in Kalika Park. esakal
नाशिक

SAKAL Impact News : उद्यान स्वच्छता मोहीमेस सुरवात; कालिका उद्यानातील खेळण्यांचीही लवकरच होणार दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : परिसरातील कालिका पार्क उद्यानाची दुरवस्थेचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसारित झाल्यानंतर उद्यान विभागाकडून तत्काळ उपाययोजना करत उद्यानातील स्वच्छता मोहीमेस सुरवात करण्यात आली.

येथील खेळणीदेखील लवकरात लवकर दुरुस्त करणार असल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. (Toys in Kalika Park will repaired soon SAKAL Impact News)

गेल्या अनेक महिन्यांपासून उद्यानात कचरा एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यात आला होता. मात्र घंटागाडी विभागाच्या कामचुकारपणामुळे येथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते.

हा कचरा शनिवारी (ता.७) तत्काळ उचलण्यात आला आहे. उद्यानातील संरक्षण भिंती तुटलेल्या अवस्थेत असून या कधीपर्यंत दुरुस्त होतील, असा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. स्थानिक पोलिस प्रशासन अजूनही झोपेतच आहेत का, असा संताप प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहे. पोलिसांनी येथे सकाळ, सायंकाळ गस्त घालण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

"‘सकाळ’ चे आम्ही सर्व आभार मानतो. वृत्त प्रसारित झाल्यानंतर लागलीच उद्यान स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली आहे."- कल्याणी थोरात, गृहिणी

"उद्यानात स्वच्छता मोहीम सुरू झाली असून, येथे प्रेमीयुगुल व मद्यपींवर कधी कारवाई होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे."
- वृंदा गवळी, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''इतरवेळी तुम्हाला शिवतीर्थ आठवतं, पण यावेळी...'' तेजस्विनी पंडितने मराठी कलाकारांना सुनावलं

ना पक्ष, ना झेंडा! फक्त दोन खुर्च्या, चौघांची भाषणं, मागे महाराष्ट्र; विजयी मेळाव्याचं कसं आहे नियोजन

Latest Maharashtra News Updates : दोन पक्षांचा एक पक्ष करावा; ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

SCROLL FOR NEXT