Devotees enjoying entertainment at Yatrotsav such as break dance, rahat palana, maut ka kua esakal
नाशिक

Vadangali Yatrotsav : वडांगळीच्या यात्रोत्सवात लाॅकडाऊन नंतर व्यापाऱ्यांनी साधली पर्वणी

कोरोना काळातील नुकसान भरून निघाल्याची भावना

सकाळ वृत्तसेवा

वडांगळी (जि. नाशिक) : करोना महामारीच्या कटू प्रसंगानंतर येथील ग्रामदैवत व बंजारा समाजाचे श्रद्धास्थान सतीदेवी सामतदादा यात्रोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात झाला.

यात्राकाळात सलग पाच ते सहा दिवस स्टॉल उभारणीतून चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त करण्याची पर्वणीच मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून उमटत आहेत. (Traders celebrate Vadangali Yatrotsav after lockdown nashik news)

विविध ठिकाणच्या यात्रांमध्ये स्टॉल लावणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी वडांगळीची यात्रा ही लाकडाऊननंतरच्या काळातील पर्वणी ठरली आहे. त्यामुळे कोरोना काळात झालेले नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, असा आशावाद व्यापारी व्यक्त करीत आहेत.

छोटे-मोठे खेळणी दुकानांपासून ते खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल उभारण्यात आले होते. त्यात स्थानिक, होतकरू तरुण, तसेच वर्षांनुवर्षे विविध गावांतील जत्रा करणाऱ्या व्यापाऱ्यांचा समावेश होता. यात्रोत्सवात स्थानिकांनाही चांगला रोजगार मिळाला.

सलग सहा दिवस पर्वणीचा अनुभव आल्याने फक्त यात्रोत्सवातच नियमित रोजगार असणाऱ्या कुटूंबांचे आर्थिक नुकसान भरून उत्पन्नात वाढ झाली आहे. बंजारा भाविकांनी बंजारा पेहराव, आभुषणे, दागिने आदींची खरेदी केली.

बंजारा बोली भाषेतील गाणी व कॅसेटचे स्टॉल, नेहमी यात्रेत येणारी दुकाने मात्र बदलत्या काळानुसार लुप्त झाल्याचे जाणवले. यात्रोत्सवात घरगुती भांडी दुकाने, स्टॉल यात्रोत्सवाच्या सांगतेनंतरही आठवडाभर कायम आहेत.

ब्रेक डान्स, पाळण्यांची लक्षवेधी कमाई

यात्रोत्सवात दहा रुपयांच्या वस्तूपासून हजार रुपयांच्या वस्तूपर्यंतची विविध दुकाने होती. मुंबई मार्केट, कुछभी लो दस रुपये, लाट है- सेल है, कटलरी दुकाने महिला भाविकांच्या खरेदीने फुलले होते. ब्रेक डान्स, विविध राहाट पाळणे अन् मौत का कुऑं या ठिकाणी अनेकांनी आनंद लुटला.

त्यामुळे ही दुकानं यात्रोत्सवात सर्वाधिक लक्षवेधी व कमाईचे ठिकाण ठरली. मौत का कुऑंतील दुचाकीस्वाराचा थरार पाहून अंगावर शहारे आले. येथील झगमगाटानेही लक्षवेधीत कमाई करुन दिली. त्यात दहा प्रकारातील पाळणे व बुद्धीला चालना देणाऱ्या मनोरंजनाचे स्टॉल पहिल्यांदाच आलेले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

"वडांगळीची रविवारीची यात्रा चांगली झाली. आम्ही खुप गर्दी अनुभवली आहे."

-विक्रम गिते, नारळ विक्रेते

"वडांगळीच्या यात्रेत स्टॉल उभारणारी आमची तिसरी पिढी आहे. कोरोना महामारीमुळे गतवर्षी स्टॉल होता, पण भाविक आले नाहीत. यंदा भाविकांची संख्या वाढली होती."

-गौरव खुळे व अरूण खुळे, फुले विक्रेते

"वडांगळी यात्रेत पंधरा वर्षांपासून लाल निशाण, झेंडे, नारळ, शेरणी आदींचे दुकान आहे. यंदा दोन दुकाने होती. त्या माध्यमातून लॉकडाऊन काळातील नुकसान भरून येईल."

-सुलतानाभाभी शेख व जमीर शेख, वडांगळी

"वडांगळी ग्रामपंचायतीला यात्रोत्सवातील विविध स्टॉलच्या कर वसुलीतून सुमारे ७३ हजार रुपये मिळाले. राहाट पाळणा लिलाव बोली रक्कम तीन लाख ४१ हजार रुपयांसह सुमारे चार लाख १४ हजार रुपये व्यापारी स्टॉल कर वसुली झाली आहे." -पांडुरंग सोळुंके, ग्रामविकास अधिकारी, वडांगळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT