k k wagh chandori.jpg 
नाशिक

VIDEO : खंडेरायाच्या लग्नाला!..'ट्रेडिशनल डे' ला घातला जागरण गोंधळ...

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (चांदोरी) जानेवारी महिना आला की, कॉलेजमध्ये 'अँन्युअल डे'चे वारे वाहू लागतात. डेज म्हणलं की तरूणाईत सळसळता उत्साह दिसतो. साडी डे, रोज डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे, मिसमॅच डे असे अनेक डेज साजरे केले जाते. चांदोरी येशील के के वाघ महाविद्यालयात 'डेज' मध्ये विविध डेज मोठ्या उत्साहाने साजरे केले जात आहे. त्यातल्यात्यात चांदोरी सारख्या ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये वेगळेच चित्र दिसले. 

विद्यार्थी व शिक्षक गेले भक्ती रसात वाहून

 'ट्रॅडिशनल डे' होता परंतु, विद्यार्थी व शिक्षक भक्ती रसात वाहून गेले. यात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मजबूत करणाऱ्या वारकरी संप्रदायाची ओळख करून देणारी दिंडी काढली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारातून युवा वारकर्यांनी प्रवेश करताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व संत तुकारामांच्या अभगांच्या तालासुरातील सादरीकरणाने वातावरणात प्रसन्नता निर्माण केली.

लोकसंगीताच्या बहरदार सादरीकरणाने व देखाव्यांनी उपस्थितांची मने 

हरिनामाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. तसेच, दुसऱ्या एका विद्यार्थी समूहाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरीचा खंडोबा, बाणाई व म्हाळसा यांच्या रुपात येऊन गोंधळ जागरणाची गाणी म्हटली. लोकसंगीताच्या बहरदार सादरीकरणाने व देखाव्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी स्नेहसंमेलन समन्वयक डॉ.अरुण ठोके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना दाद देऊन त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT