Traffic jam reference image esakal
नाशिक

Nashik : शहरभर ट्रॅफिक जाम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर सुरू असलेले महानुभाव पंथाचे संमेलन आणि केटीएचएम महाविद्यालयाच्या परिसरात मविप्र संस्थेची निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. २९) सुरू होती.

या दोन्हींचा ताण नाशिक शहरातील वाहतुकीवर होऊन ट्रॅफिक जाम झाली होती. स्मार्ट रोड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, शालिमार, गंगापूर रोड या परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर, वाहतूक पोलिसांची वाहतूक सुरळीत करताना चांगलीच दमछाक झाली. (Traffic jam across city Nashik Latest Marathi News)

गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक या शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळांची निवडणूक होऊन सोमवारी सायंकाळपर्यंत मतमोजणी सुरू होती. यासाठी जिल्हाभरातून या संस्थेचे सभासद नाशिकमध्ये सकाळपासून दाखल झाले होते. तर, डोंगरे वसतीगृह मैदानावर महानुभाव पंथाचे संमेलन असल्याने राज्यभरातून महानुभाव पंथाचे भाविक शहरात दाखल झाले होते.

सायंकाळी या दोन्ही ठिकाणी एकावेळी गर्दी वाढली. वाहनांच्याही संख्या वाढली. त्याचा ताण शहराच्या अन्य रस्त्यावरील वाहतुकीवर पडल्याचे दिसून आले. जुना मुंबई- आग्रा रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन लांबच्या लांब रांगा लागल्या. यामुळे या मार्गावरील सिग्नल व्यवस्था कोलमडून पडली.

तर, या वाहतूक कोंडीत असलेल्या वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. अशोकस्तंभ, रविवारी कारंजा, शालिमार चौक, मेहेर सिग्नल, गंगापूर नाका, त्र्यंबक नाका याठिकाणी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यात या रस्त्यालगत अनधिकृतपणे पार्क केलेल्या चारचाकी वाहनांची भर पडल्याने वाहतुकीची अजूनच कोंडी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT