Barat esakal
नाशिक

Nashik News : गोरज मुहूर्तांवरील लग्न वाहतुकीला डोकेदुखी; रस्त्यालगत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. औरंगाबाद रोड, मुंबई- आग्रा महामार्ग यासह शहरातील काही उपनगरी परिसरामध्ये असलेल्या लॉन्सवर सायंकाळची गोरज मुहूर्तांवरील विवाह सोहळ्यामुळे वाहतुकीच्या डोकेदुखीत आणखीच भर पडली आहे. अनेक लॉन्सच्या बाहेर पुरेशी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यालगत पार्क होत असल्याने त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन त्याचा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागतो आहे.

काही वर्षांपासून सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर लग्न सोहळ्यांची प्रथा रूढ होते आहे. पूर्वी, अपवादात्मक परिस्थितीमध्ये सायंकाळची विवाह सोहळे होत असतं. मात्र, अलीकडे गोरज मुहूर्तांवरील लग्न सोहळ्याची फॅशनच झाली असून, ते मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. परंतु या लग्न सोहळ्याचा थेट परिणाम शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर होतो आहे. लग्न सोहळ्यासाठी परगावाहून येणारे मंडळी स्वत:च्या वाहनांची दाखल होतात. त्याचप्रमाणे, शहर परिसरातील मंडळीही विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावतात.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

दुसरीकडे शहरात सर्वाधिक मंगल कार्यालये व लॉन्स ही औरंगाबाद रोडवर आहेत. पूर्वी मंगल कार्यालये शहरात होती. परंतु वाहतुकीला अडथळा व पार्किंगची सुविधा होत नसल्याने बहुतांशी मंगलकार्यालय व लॉन्स ही शहराबाहेर मुख्य रस्त्यालगत उभे राहिले आहेत. यात प्रामुख्याने सर्वाधिक कार्यालये व लॉन्स ही औरंगाबाद रोडवर आहेत. याशिवाय, मुंबई-आग्रा महामार्ग, गंगापूर रोड, नाशिकरोड, त्र्यंबक रोडवरही मंगल कार्यालये आहेत. यातील कोणत्याही ठिकाणी सायंकाळची विवाह असल्यास त्या मार्गावरील वाहतुकीची समस्या उद्भवते आहे.

औरंगाबाद रोडवर सर्वाधिक कोंडी
औरंगाबाद नाका ते शिलापूरपर्यंतच्या औरंगाबाद रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा शेकडो मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. लग्न सराईमध्ये या रोडवर दिवसाही कमालीची वाहतूक कोंडी होते. मात्र, सायंकाळच्या विवाह सोहळ्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर स्वरूपाची झाली आहे. अनेक मंगल कार्यालयाबाहेर पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे वाहने रस्त्यालगतच पार्क केली जातात. त्यातच रस्त्यालगतच नवरदेवाची वरात काढली जाते.

त्यावेळी तासन्‌तास वरातीमध्ये वऱ्हाडी नाचतात. त्यामुळेही अनेकदा वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशीच परिस्थिती नाशिकरोड, गंगापूर रोड, महामार्गावर उद्भवत असते. या वाहतूक कोंडीत तासन्‌तास वाहनांच्या रांगा लागून राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT