truck at pune highway 1.png 
नाशिक

पुणे महामार्गावरील घटना..वळण घेताना ट्रकमधील लोखंडी सामान अचानक खाली पडताच...मोठा अनर्थ...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पुणेमार्गाच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून साहित्य रस्त्यावर पडण्याची घटना मंगळवारी (ता. 4) सकाळी सहाच्या सुमारास द्वारका चौकात घडली. सकाळच्या वेळेत वाहतूक कमी असल्याने अनर्थ टळला. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले साहित्य बाजूला नेत वाहतूक सुरळीत झाली. 

असा घडला प्रकार

पुणे मार्गाच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन ट्रक (केए 11, के 5172) जात होता. सोमवारी (ता. 4) सकाळी सहाच्या सुमारास ट्रक द्वारका चौकातून द्वारका हॉटेलच्या दिशेने वळण घेत असताना अचानक ट्रकमधील लोखंडी साहित्य रस्त्यावर पडले. साहित्य पडण्याचा आवाज मोठ्याने झाल्याने परिसरातील नागरिक काही वेळेसाठी भयभीत झाले अन्‌ वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविली. क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले साहित्य बाजूला केले व नंतर पुन्हा ट्रकमध्ये ठेवण्यात आले. सुमारे तीन तासांच्या कामकाजानंतर वाहतूक सुरळीत झाली. सकाळची वेळ असल्याने वाहतूकही कमी होती आणि नागरिकांचाही वावर नसल्याने कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

Parner Accident: भरधाव डंपरखाली दुचाकीस्वार ठार, पारनेर तालुक्यात भीषण अपघात, पोयटा वाहतूक करणाऱ्या डंपरने युवकाला चिरडले

Gold Rate Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! उच्चांकापासून 21 हजारांनी स्वस्त; दर आणखी कमी होणार? जाणून घ्या आजचा भाव

ज्युनिअर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या ड्रॅगन सिनेमाची केली घोषणा; पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमात करणार काम

Sangamner Accident: पोहण्याचा आनंद ठरला काळ; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, दगडाच्या खाणीत पोहायला गेले अन् परतलेच नाहीत

SCROLL FOR NEXT