Vehicles parked on road in Dindori Naka area esakal
नाशिक

Nashik : बेशिस्त वाहनचालकांना हवी शिस्त,वाहतूक पोलिसांनी द्यावे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : दिंडोरी नाका परिसरात बेशिस्तपणे वाहने रस्त्यावरच थांबविली जात असल्यामुळे इतर वाहनांना त्यांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. या वाहनांना शिस्त लावण्यासाठी या भागात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी फिरकत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अरुंद रस्त्यावर प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या वाहनांच्या रांगा रस्त्याच्या अर्ध्याअधिक भागापर्यंत पोहचत असल्याने ही समस्या वाढत आहे.

दिंडोरी नाक्याच्या या भागात पंचवटी कारंजा, निमाणी, पेठ रोड या मार्गाने वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यात बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारी शेतमालाच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. या भागात दिंडोरी, वणी आदी परिसराकडे जाणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी थांबलेल्या असतात. (Traffic Problem Undisciplined drivers need discipline traffic police should pay attention Nashik News)

याच भागात बसचाही थांबा आहे. तसेच रिक्षांचाही थांबा येथेच असल्यामुळे वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. अशा या वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यानंतर ती वाहने रस्त्याच्या अर्ध्याअधिक भागापर्यंत थांबतात. या वेळी मागून येणाऱ्या वाहनांची कोंडी होऊन ही कोंडी चौकापर्यंतच्या भागात पोहचते. त्यामुळे इतर वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्याचा त्रास होतो.

दिंडोरी नाक्यावरील वर्दळ लक्षात येऊन येथील वाहनचालकांना शिस्त लावण्याची गरज भासत आहे. येथून हाकेच्या अंतरावर पंचवटी पोलिस ठाणे असून, निमाणीच्या बाजूला या नाक्यावरच्या भागात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी थांबलेले असतात.

असे असताना ज्या भागात रिक्षा, बस आणि टॅक्सी या वाहनांचे थांबे एकाच ठिकाणी आहे. तेथील गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणताच प्रयत्न होत नसल्याचे चित्र येथे दिसत असल्याने त्याचा त्रास इतरांना सहन करण्याची वेळ येत आहे. या भागात थांबणाऱ्या वाहनचालकांना हवी शिस्त, वाहतूक पोलिसांनी द्यावे लक्ष अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुणे पोलिसांनी मारणे टोळीच्या गुंडाच्या आवळल्या मुसक्या; भाजप कार्यकर्त्याला मारहाणीनंतर ९ महिने होता फरार

Solapur News: 'संपर्कप्रमुख कोकिळांवर धावून गेले शिवसैनिक'; साेलापुरातील शिवसेना (उबाठा) बैठकीत राडा, नेमकं काय घडलं..

राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी प्रकरणी शहराध्यक्षांना नोटीस, नृत्य करणाऱ्या महिलेनं म्हटलं, चुकीचं काहीच नाही

Sharad Pawar: शरद पवारांच्या बैठकीला तीन आमदारांची दांडी; आगामी निवडणुका सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून लढणार

'तिने जाणून बुजून किसिंगचे 37 रिटेक घेतले.' कार्तिक आर्यन किसिंग करुन वैतागलेला, शुट संपताच म्हटला...' झालं बाबा एकदाचं'

SCROLL FOR NEXT