Traffic Change esakal
नाशिक

Nashik Traffic Change : बाल येशू यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

उपनगर येथील बाल येशू यात्रेनिमित्त गर्दी होत असल्याने शहर वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Change : उपनगर येथील बाल येशू यात्रेनिमित्त गर्दी होत असल्याने शहर वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

१० व ११ फेब्रुवारीला हा बदल राहणार आहे. (Traffic route changes for child Jesus Yatra on 10 and 11 february nashik news)

पुणे - सिन्नरच्या दिशेकडून द्वारकाहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बिटको चौक - देवळाली गाव - विहीतगाव - वडनेर गेट व तेथून पाथर्डी फाटा मार्गे जातील. पुणे, सिन्नर बाजूकडून येणारी द्वारका सर्कल व धुळेकडे जाणारी वाहने सिन्नर फाटा, बिटको चौक, जेल रोड, नांदूर नाका, जत्रा चौफुलीमार्गे धुळ्याकडे जातील.

द्वारका सर्कल बाजूकडून सिन्नर, पुणेकडे जाणारी अवजड वाहने द्वारकाकडून काठे गल्ली सिग्नल, फेम सिनेमा डावीकडे वळून ड्रीम सिटी, नारायण बापूनगर, सैलानी बाबा चौक, जेल रोड मार्गे सिन्नर, पुण्याकडे जातील व येतील.

सदरचा वाहतूक मार्गातील बदल १० ते ११ फेब्रुवारीदरम्यान सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत या वाहतूक मार्गातील बदल राहणार आहेत. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT