police esakal
नाशिक

Nashik News : इ- चलन मशिनचे वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण

‘वन नेशन-वन चलान’ हा नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरअंतर्गत (एनआयसी) पायलट प्रोजेक्ट नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘वन नेशन-वन चलान’ हा नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरअंतर्गत (एनआयसी) पायलट प्रोजेक्ट नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सुरू आहे. यासाठी इ-चलन मशिन शहर वाहतूक पोलिसांच्या हाती पोचले आहेत.

परंतु त्यातील काही तांत्रिक अडचणींमुळे अंमलदारांसाठी विशेष प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ()

इ-चलनमुळे देशभरातील कुठल्यावर बेशिस्त वाहनांवर एका क्लिकवरून दंडात्मक कारवाई करणे सोपे झालेले आहे. गृह विभागाने राज्यभरातील अपघातांना आळा घालण्यासाठी आणि बेशिस्तांवर धडक कारवाई करण्यासाठी ‘वन नेशन-वन चलान’च्या पायलट प्रोजेक्ससाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाची निवड केली होती. त्यासाठी गृहविभागाने ५७ लाखांच्या निधीही मंजूर केला होता.

त्याअंतर्गत यंत्रसामुग्रीसह इ-चलन मशिन खरेदी केले. इ-चलनाच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून शहर आयुक्तालय हद्दीमध्ये कारवाई सुरू केलेली आहे. तसेच, वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. मंगळवारी (ता. १३) वाहतूक शाखेतील अंमलदारांसाठी दोन सत्रांमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेतून अंमलदाराच्या शंकांचे निरसन करण्यात आले असून, मशिनच्या हाताळणीचेही प्रशिक्षण अंमलदारांना देण्यात आले. यामुळे बेशिस्तावर जागेवर दंडात्मक कारवाई करणे सोपे तर झाले आहेच, शिवाय, राज्याबाहेरील कोणत्याही बेशिस्त वाहनावरही कारवाई करणे सोपे झाले आहे.

''नाशिकमध्येच पायलट प्रोजेक्ट असल्याने इ-चलन मशिन हाताळताना अंमलदारांना काही अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे वाहतूक शाखेतील अंमलदारांसाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करून प्रशिक्षण देण्यात आले आहे.''- आनंदा वाघ, सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT