koshimbe.jpg 
नाशिक

गाडीवर नाव "अत्यावश्‍यक सेवा'' अन् आत भलतचं... पोलीसांनी पाहताच धक्काच!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : पिक-अपवर पुढच्या बाजूला "अत्यावश्‍यक सेवा किराणामाल, शेतीऔजारे व भाजीपाला' असा बोर्ड दिसल्याने पिक-अप चालकाकडे गाडीत काय आहे, याबाबत चौकशी केली. गाडीत काही नसल्याचे चालकाने सांगितले. कत्तलीसाठी विनापरवाना चार बैलांची वाहतूक करणारी पिक-अप व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेत चालकासह एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या व्हॅनमधून चार बैलांची सुटका करण्यात आली. खोटा परवाना लावून शासनची फसवणूक केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला. 

अशी आहे घटना

कोशिंबे (ता. दिंडोरी) येथील चौफुलीवर आपले कर्तव्य बजावत असताना हवालदार अंबादास गायकवाड, कोशिंबेचे तलाठी महेश भोये, ग्रामसेवक एकनाथ गायकवाड यांनी भनवडकडून लखमापूरकडे जाणारी पिक-अप (एमएच 15 एफव्ही 1152) थांबविली. पिक-अपवर पुढच्या बाजूला "अत्यावश्‍यक सेवा किराणामाल, शेतीऔजारे व भाजीपाला' असा बोर्ड दिसल्याने पिक-अप चालकाकडे गाडीत काय आहे, याबाबत चौकशी केली. गाडीत काही नसल्याचे चालकाने सांगितले. त्याचवेळी गाडीतून जनावरांचा आवाज आल्यानंतर पोलिसांना गाडीत चार बैल आढळून आले. या बैलांची वाहतूक कत्तलीसाठी होत असल्याचे पोलिसांना कळताच चालक सचिन पवार (रा. बजरंगवाडी, विल्होळी) याच्याकडे विचारपूस केली असता त्याने राजू सोनवणे (रा. पिंपळगाव बसवंत) यांच्या सांगण्यावरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी चार बैलांसह पिक-अप व्हॅन असा सुमारे पाच लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करत चालक आणि राजू सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बैलांची सुटका करत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्यांची येथील श्रीकृषी गोशाळा, पांजरपोळ येथे चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली. 

अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली फसवणूक 

या वेळी जप्त करण्यात आलेल्या वाहनावर "जीवनावश्‍यक सेवा माल वाहतूक, किराणा वाहतूक' असा बोर्ड लावण्यात आला होता. मात्र जीवनावश्‍यक सेवेऐवजी त्यातून जनावरांची बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात आली. यामुळे खोटा परवाना लावून शासनची फसवणूक केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT