chandwad vad.jpg 
नाशिक

वृक्षांचा डेरेदारपणा हिसकावला! घेर-उंचीत घोळ; मूल्यांकन कमी दाखवत ठेकेदारावर मेहरनजर

भाऊसाहेब गोसावी, हर्षल गांगुर्डे

नाशिक : (चांदवड) चांदवड-मनमाड रस्ता विस्तारीकरणापूर्वी एल. एन. मालविया व वन विभागाच्या संयुक्त सर्व्हेत ४८२ झाडे दाखविली आहेत. ही सर्व झाडे रस्त्यासाठी तोडण्याची गरज असल्याने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने चांदवड वन विभागाकडे परवानगी मागितली होती. तशी परवानगीही मिळाली आहे. 

झाडांची संख्या ‘अर्थ’पूर्णरीत्या कमी दाखवल्याचे उघड

दरम्यान, यापूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या प्रतिक्रियेत ऐंशी टक्के झाडे ही नगर परिषद हद्दीत असल्याचे म्हटले आहे. तसे असल्यास या झाडांची संख्या नगर परिषदेच्या एक किलोमीटरच्या हद्दीत साधारण पावणेचारशेवर जाते, मग प्रश्न असा पडतो, की उर्वरित २१ किलोमीटर हद्दीत फक्त शंभरच झाडे होती का? तसे म्हटल्यास कुठलाही चांदवडकर यावर विश्वास ठेवणार नाही. या अर्थाने वन विभागाने व मालविया कंपनीने केलेल्या सर्व्हेत झाडांची संख्या ‘अर्थ’पूर्णरीत्या कमी दाखवल्याचे उघड होत आहे. 

ठेकेदाराचा खिसा भरताना कुणाकुणाचे हात ओले?

अगोदरच वृक्षांची संख्या कमी दाखवली असताना अनियमिततेच पुढचं पाऊल अधिक खोलात रुतलेलं आढळतं. ते असं, की चांदवडच्या डेरेदार झाडांचे मूल्यांकन करताना त्याचा डेरेदारपणाच संबंधितांनी हिसकावला आहे. झाडांची उंची व घेर कमी दाखवून ठेकेदारावर मेहरनजर दाखवली आहे. यातून मात्र शासनाचा मोठा महसूल बुडवत तो थेट ठेकेदारांच्या खिशात घातल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराचा खिसा भरताना कुणाकुणाचे हात ओले झाले, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. 

वृक्षतोडीबाबत वेळोवेळी वन विभागाशी झालेल्या पत्रव्यवहारातून जे कागदपत्रे उपलब्ध झाले, त्यात मालविया कंपनीने चांदवड-मनमाड रोड वृक्षगणनेचा गोशवारा देताना मात्र नगर-बीड (NH561) असा उल्लेख केला आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांनी फक्त तांत्रिक चूक म्हणत हात वर केले आहेत. - विलास संसारे, सचिव जीवन नागरी पर्यावरण व प्राणी संरक्षण संस्था 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

Maharashtra Drought Fodder Camp : चारा छावणीसाठी शासनाचे नियम काय? किती अनुदान मिळते; जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अधिकार

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT