Tree Plantation Competition  esakal
नाशिक

‘रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका’

मधुकर घायदार

कनाशी (जि. नाशिक) : ठाणे येथील मातृसेवा फाउंडेशन आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणींसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं (Plantation) आणि त्यासोबत एक फोटो (Selfie) काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला बक्षीस (Prize) मिळेल, अशी ही स्पर्धा आहे. (Tree Plantation competition by Matruseva foundation shikshak dhye maharashtra Nashik News)

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी एक रोपटं लावायचे. त्या रोपट्यासोबत सेल्फी काढून ७४९९८६८०४६ या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवायचा आहे. सदर स्पर्धा नि:शुल्क असून, सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी झाड देशी असावे, रोपट्याची लागवडीचा फोटो काढताना उभा मोबाईल ठेवावा, संपूर्ण रोपटे आणि आपला चेहरा दिसेल असा सेल्फी असावा, सेल्फीसोबत माहिती पाठवावी, संपूर्ण नाव, वय, पत्ता, मोबाइल नंबर, व्हाट्स ॲप नंबर, कोणते झाड लावले त्याचे नाव आणि त्या वृक्षाबद्दलची माहिती पाठवायची आहे. अधिक माहितीसाठी https://shikshakdhyey.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवडक स्पर्धकांना शिक्षक ध्येयचा प्रिंट दिवाळी अंक कुरिअरने पाठविण्यात येईल. अंतिम निकाल, विजेत्यांची नावे ८ ऑगस्टच्या शिक्षक ध्येय अंकात प्रसिद्ध होतील. सेल्फी पाठविण्याची अंतिम मुदत १५ जुलै सायंकाळी ५ पर्यंतच आहे.
या मोहिमेचा उद्देश झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून, निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाड रुजवण्याचा असल्यामुळे या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या सावंत आणि शिक्षक ध्येयचे संपादकीय मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

Online Gaming Bill 2025: Asia Cup पूर्वीच ड्रीम 11ची माघार; बीसीसीआयला किती कोटींचे नुकसान होणार?

Satara News:'मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला फलटणकरांचा पाठिंबा'; पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका

Mercury Transit 2025: बुध ग्रहाचा मघा नक्षत्रात गोचर; जाणून घ्या कोणत्या राशींना होईल धनलाभ!

Nasik Police : ‘डायल ११२’ वर कॉल करा आणि ४ मिनिटांत पोलिसांना बोलवा! नाशिक पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ देशात सर्वोत्कृष्ट

SCROLL FOR NEXT