Department of Tribal Development esakal
नाशिक

Tribal Development Department : ...अन्यथा निधी देणार नाही; आदिवासी विकास विभाग आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

Tribal Development Department : जिल्हा परिषदेला नियतव्यय कळविल्यावरही विभागांकडून दायित्व निश्चित होत नसताना दुसरीकडे आदिवासी विकास विभागाला आवश्यक असलेली माहिती देण्यास जिल्हा परिषदेच्या विभागांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे.

आदिवासी विकास विभागाने यंदा जिल्हा परिषदेकडे कामनिहाय निधी, त्यावरील खर्च व दायित्व अशा स्वरूपात माहिती मागविली आहे. मात्र, विभागांकडून केवळ एकूण निधी, खर्च निधी व दायित्व अशी ढोबळपणे माहिती देण्यात येते.

मात्र, ही माहिती प्राप्त झाल्याशिवाय निधी न देण्याची आक्रमक भूमिका आदिवासी विकास विभागाने घेतली आहे. (Tribal Development Department has taken stance of not disbursing funds without all receiving information nashik news)

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला नियतव्यय कळविले जात असते. तसेच, आदिवासी विकास विभागाकडूनही जिल्हा परिषदेला शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि बांधकाम विभागाला नियतव्यय कळविले जात असते. त्यासाठी संबंधित विभागांनी एकूण निधीतून दायित्व वजा जाता निधी नियोजन विभागाला द्यायचे असते.

मात्र, यंदा आदिवासी विकास विभागाने जिल्हा परिषदेतील संबंधित विभागांकडे कामनिहाय प्राप्त निधी, त्यावर झालेला खर्च व दायित्व अशा स्वरूपात माहिती मागविली आहे. जिल्हा परिषदेत प्रामुख्याने मागील कामांवर दायित्व दाखवून निधी मागणी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले.

दोन वर्षांची मर्यादा असतानाही तीन ते चार वर्षे कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे कामांचा निधी परत करायचा अन् पुन्हा त्याची मागणी करण्याचे प्रकार होतात. बांधकाम विभागांतर्गत होत असलेल्या रस्ते नियोजन गोंधळही त्यास कारणीभूत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळेच खुद्द तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनीच सदर माहिती मागविण्याचे आदेश आदिवासी विकास विभागास दिल्याचे बोलले जाते.

यासाठी आदिवासी विकास विभागाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला पत्रही दिले आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे संबंधित विभागांनी एकूण निधी, खर्च झालेला निधी व दायित्व अशी पारंपरिक माहिती दिली. त्यावर आदिवासी विकास विभागाने पुन्हा पत्र देत, दिलेल्या फॉरमेटमध्येच माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

यास संबंधित विभागांकडून दाद मिळत नसल्याने आदिवासी विकास विभागाकडून सतत पाठपुरावा सुरू आहे. ठरल्याप्रमाणे माहिती न मिळाल्यास निधी देणार नसल्याची भूमिका यंदा आदिवासी विकास विभागाने घेतल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT